Actress Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

Actress Accident: दिवाळीच्या रॉकेट फटाक्यामुळे अभिनेत्री यामिनी मल्होत्राच्या कारला धक्का बसला, मात्र ती सुरक्षित राहिली. या घटनेने फटाक्यांसोबत सुरक्षिततेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले.

Shruti Vilas Kadam

Actress Accident: दिवाळीच्या सणात अभिनेत्री यामिनी मल्होत्रासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. तिच्या कारवर अचानक रॉकेट फटाका पडल्याने गाडीला नुकसान झाले, मात्र या अपघातात तिचा जीव सुरक्षित राहिला. या घटनेमुळे सोशल मीडियावर दिवाळीतील सुरक्षेबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

यामिनीने स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली. तिनं सांगितले की, चालत्या गाडीवर रॉकेट आला, पण नशीबाने तो काचेतून आत गेला नाही. जर आत घुसला असता, तर तिली गंभीर दुखापत झाली असती. यामिनी म्हणाली, “देवाची कृपा की मी यातून वाचले. कृपया रॉकेट किंवा फटाके फोडताना काळजी घ्या, तुमची छोटीशी मजा जीवघेणी ठरू शकते.”

या अपघातामुळे यामिनीच्या कारच्या बाह्य भागाला नुकसान झाले, पण ती स्वतः सुरक्षित आहे. या घटनेमुळे रॉकेट उडवताना योग्य सुरक्षा असणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा लोकांच्या लक्षात आले. या घटनेने दिवाळीच्या सणाच्या आनंदातही सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

यामिनी मल्होत्रा ही टीव्ही आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून अभिनेत्री असण्याबरोबरच ती डेन्टिस्ट ही आहे. तिचा चाहतांचा वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिच्या पोस्ट्स चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदान व मतमोजणी परिसरात १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्र – जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Crime News : २४ वर्षांच्या तरुणीनं जाळं टाकलं, मुंबईचा बिल्डर अडकला; लॉजवर बोलावलं, आरेच्या जंगलात नेऊन...

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News : एका कानानं एकलं, दुसऱ्या कानानं सोडून दिलं; आगारप्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

SCROLL FOR NEXT