Urvashi Dholakia Bold Photos  Instagram @urvashidholakia
मनोरंजन बातम्या

Urvashi Dholakia Photo: 'तू नक्की आई आहेस ना?' ४३ वर्षीय कोमोलिकाची कातिल करणारी अदा पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

उर्वशी ढोलकियाने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Pooja Dange

Urvashi Dholakia Viral Photos: सिनेसृष्टीतील तसेच टीव्ही जगतातील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या वयाचा अंदाज लावणे निव्वळ अशक्य आहे. या अभिनेत्रींनमध्ये समावेश होतो तो अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिचा. उर्वशीकडे पाहून तुम्हाला वय सांगता येणार नाही. परंतु 43 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय आहे. नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनेक अपडेट अभिनेत्री शेअर करत असते. नुकतेच शेअर केलेले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचे वय जरी ४३ असले तरी ती अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. तिचे सौंदर्य अनेक तरुणींना लाजवेल असे आहे. उर्वशी ढोलकियाने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे सौंदर्य पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. मल्टिकलर बिकिनीमध्ये उर्वशीने तिचे फोटो शेअर केले आहेत. तिचा हॉट फोटो आणि स्वॅग अनेकांना थक्क करणारा आहे.

बिकनीसह उर्वशीचे सनग्लासेस सुद्धा झक्कास आहेत. या बोल्ड अवतारात उर्वशीने विविध पोज दिल्या आहेत. उर्वशी तिचे व्हॅकेशन एन्जॉय करत आहे आणि स्विमिंग पूलजवळ तिने हे फोटो काढले आहेत.

उर्वशी यावेळी स्विमिंग मूडमध्ये आहे. उर्वशीने स्वतः या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'पोहण्यासाठी परफेक्ट वातावरण, असे कॅप्शन उर्वशीने या फोटोंना दिले आहे. वयाच्या 43 व्या वर्षी उर्वशीचा हा बोल्ड अवतार पाहून नेटकरी देखील चकित झाले आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहतेही कमेंट करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले - कोमोलिका तू माझी क्रश आहेस. तर दुसर्याने लिहिले आहे - तू आई आहेस असे कोणीही म्हणू शकत नाही. तू खूप तरुण दिसत आहेस. तसे आणखी एकाने लिहिले आहे, असं वाटतंय की तू कुणाची आई नाहीस, बहीण आहेस.

उर्वशी ढोलकिया लोकप्रिय टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की'मध्ये दिसली होती. या मालिकेत तिने कोमोलिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना तिची दाद घेण्यास भाग पडले होते. तिचे भूमिका जरी नकारात्मक असली तरी आजही लोकांच्या लक्षात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT