Ajay Devgn Movie: अजय देवगणची 'भोला यात्रा' ठाण्यातून सुरू; चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवा उद्योग

अजय देवगण त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Bholaa Yatra
Bholaa YatraInstagram @ajaydevgn

Bholaa Yatra For Movie Promotion: बॉलिवूडमधील चित्रपटांना यश मिळवणे फार कठीण झाले आहे. चित्र[चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार जीवाचे रान करून चित्रपट बनवतात आणि प्रेक्षकांपर्यंत नेतात. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचावा आणि चित्रपटाला प्रदर्शित झाल्यावर उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी चित्रपटाशी संबंधित सगळेच विविध क्लुप्त्या वापरत असतात.

सेलेब्रिटी टीव्ही आणि रिअॅलिटी शोमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतात. तर काही थेट चाहत्यांमध्ये जाऊन प्रमोशन करताना दिसतात. दरम्यान, अभिनेता अजय देवगणने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नवा फंडा वापरला आहे.

अजय देवगण त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी अजय देवगण सज्ज झाला आहे. तसेच त्याने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी 'भोला यात्रा' सुरू केली आहे.

Bholaa Yatra
Urfi Slam People: मुस्लिम समाजाने घातली उर्फीवर बंदी, उर्फीने एकाच वाक्यात केली सर्वांची बोलती बंद

भोला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अजय देवगणने 'भोला यात्रा' सुरू केली आहे. 'भोला' ट्रक ठाणे, सुरत, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली, गुरुग्राम, कानपूर आणि लखनऊ येथे जाणार आहे. प्रत्येक शहरातील प्रमुख ठिकाणी ट्रक पार्क केले जाईल आणि शहरातील लोकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अजय देवगणने त्याच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अजय मुंबईहून 'भोला ट्रक'ला हिरवा झेंडा दाखवताना दिसत आहे. ट्रकवर चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच पोस्ट करत अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भोला यात्रा सुरू झाली आहे. यात्रा लवकरच तुमच्या शहरात पोहोचणार आहे! सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजय देवगण काळ्या रंगाची जीन्स आणि शॉर्ट कुर्ता घातलेला दिसत आहे. त्याच्या कुर्त्यावर 'ओम' लिहिलेले आहे.

अजय देवगणचा 'भोला' हा दाक्षिणात्य हिट चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. यात अजय देवगण व्यतिरिक्त तब्बू, गजराज राव, दीपक डोबरियाल सारखे स्टार्स कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

'भोला'नंतर अजय देवगण 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com