Urfi Javed Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Controversy: ...त्याच कपड्यांवर मी बाहेर पडते; उर्फी जावेदनं दीड तासाच्या चौकशीत बरंच काही सांगितलं

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा कोरडे यांनी तब्बल दीड तास उर्फी जावेदची चौकशी केली.

Pooja Dange

Urfi Javed Police Enquiry: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अंगप्रदर्शन प्रकरणी उर्फीला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यामुळे आज उर्फीने आंबोली पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी उर्फीची दीड तास चौकशी करण्यात आली. तसेच या प्रकरणाबाबत उर्फीचा जबाब सुद्धा नोंदवून घेतला आहे.

मुंबई आंबोली पोलिसांनी उर्फी जावेद हिला आज चौकशीसाठी नोटीस पाठवल्यानंतर दुपारी सव्वा एक वाजता उर्फी आंबोली पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली होती. यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा कोरडे यांनी तब्बल दीड तास उर्फी जावेदची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पावणे तीन वाजण्याच्या सुमारास उर्फी जावेद आंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडली.

मी शूटिंगसाठी जे कपडे वापरते त्याच कपड्यावर मी बाहेर पडते. त्यावेळी अनेक कॅमेरामन माझे फोटो काढतात. मी कुठल्या चॅनलकडे जात नाही. अनेकदा त्याच फोटोंमुळे वाद निर्माण केला जातो. मला संविधानाने अधिकार दिले आहेत. त्याचा वापर मी करते, असे उर्फीने पोलिसांना सांगितले आहे.

उर्फीचा पोलिसांना जबाब

.मी भारताची सन्माननीय नागरिक आहे. मला माझ्या पसंदीने कपडे घालण्याचा, वागण्याचा बोलण्याचा अधिकार आहे तो अधिकार मला राज्यघटनेने दिलाय. मी जे कपडे घालते ते माझ्या पसंदीने घालते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाहीये. मी जे कपडे घालते ते माझ्या कामाच्या हिशोबाने घालते त्यावरून माझं फोटोशूट होत असत कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात आणि ते व्हायरल होतात ते मी कसे थांबवू.' अशी माहिती उर्फाने पोलिसांना दिली आहे.

उर्फी जावेद विरोधात चित्रा वाघ यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेत उर्फीला आज चौकशीसाठी बोलावले होते. काल उर्फी आणि तिच्या वकिलांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सातारा, सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान व सैनिक करणार रक्तदान

Malegaon Blast Case : RSS नेत्याच्या हत्येचा आरोप, मालेगाव प्रकरणात निर्दोष; प्रज्ञा सिंह ठाकूर कोण आहेत?

Devendra Fadnavis: मालेगाव निकालावर देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले... VIDEO

Pimpri Chinchwad Crime : ज्येष्ठ नागरिकाला बांधून बंगल्यात दरोडा; राजस्थानी दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, प्रायव्हेट फोटो काढून ब्लॅकमेलिंग, काळंनिळं होईपर्यंत मारलं; बीड हादरलं

SCROLL FOR NEXT