अनेकांची लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) यात मोठा बदल घडून आला आहे. मालिकेची मुख्य अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) मालिका सोडली आहे. तेजश्रीने मालिकेत मुक्ताची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. आता या भूमिकेत एक दुसरी अभिनेत्री झळकणार आहे. ही अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
तेजश्री प्रधानने 'मुक्ता' या भूमिकेला आपल्या उत्तम अभिनयाने उंच शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे तिच्या जाण्याने चाहत्यांना खूप वाईट वाटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळणार आहे. आता ही नवीन अभिनेत्री 'मुक्ता'चे पात्र कसे निभवणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच नवीन मुक्तासोबत सागरचा नातं कसं फुलणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तेजश्री प्रधानने ही मालिका का सोडली याचा अद्यापही खुलासा झाला नाही.
स्वरदा ठिगळे (Swarda Thigale ) ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. स्वरदाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. माझे मन तुझे झाले, स्वराज्य सौदामिनी ताराराणी या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत. स्वरदा आता लवकरच 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचे शूटिंग करणार आहे. त्यामुळे नवीन मुक्ता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने 'माझे मन तुझे झाले' मधून मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. तिने अनेक हिंदी मालिका देखील केल्या आहेत. स्वरदाने 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मध्ये ताराराणीची भूमिका साकारली होती. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2024मध्येच स्वरदा लग्नबंधनात अडकली. नवीन मुक्ता प्रेक्षकांच्या मनावर कशी जादू करते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.