Swara Bhaskar Saam tv
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar: 'काश! इंसानियत की पढ़ाई की होती...'; जंतर-मंतरवरील भाषणात स्वरा भास्करचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Swara Bhaskar: जंतर-मंतरवरील भाषणादरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 'काश! इंसानियत की पढ़ाई की होती...' असे म्हणत केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होत तिने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. "काश! इंसानियत की पढ़ाई की होती..." असे वक्तव्य करत स्वराने सरकारच्या धोरणांवर आणि संवेदनशील मुद्द्यांवरील सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली देशातील 'नीट' (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या विरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पाठिंबा दर्शवला. स्वरा भास्करही या आंदोलनात सहभागी झाली आणि तिने आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत सरकारने नागरिकांच्या भावना समजून घ्याव्यात, असे आवाहन केले.

भाषणादरम्यान स्वरा म्हणाली की, देश चालवण्यासाठी केवळ शिक्षण आणि पदवी पुरेशी नसून माणुसकी आणि संवेदनशीलताही तितकीच महत्त्वाची आहे. "जर माणुसकीचा धडा शिकला असता, तर नागरिकांच्या वेदना अधिक चांगल्या प्रकारे समजल्या असत्या," असे ती म्हणाली. तिच्या या वक्तव्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचे सोशल मिडियावर बोलले जात आहे.

स्वराने सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक करत लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच आंदोलन करणाऱ्या लोकांशी संवाद साधणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही स्वराने यावेळी म्हटले.

दरम्यान, स्वराच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काहींनी तिच्या वक्तव्याला पाठिंबा दिला असून सरकारला प्रश्न विचारणे ही लोकशाहीची ताकद असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे अनेकांनी तिच्यावर टीका करत हे वक्तव्य राजकीय हेतू साधण्यासाठी करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहे.

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT