Swara Bhaskar  Saam TV
मनोरंजन बातम्या

Swara Bhasker Marriage : अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदसोबत बांधली लगीनगाठ, पाहा लग्नाचा फोटो

समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत लग्न केल्याची माहिती स्वराने सोशल मीडियावर दिली आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Swara Bhaskar Married : अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपबद्दल चर्चेत होती. आता स्वराने सर्वानाच एक सुखद धक्का दिला आहे. समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत लग्न केल्याची माहिती स्वराने सोशल मीडियावर दिली आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

याबाबत माहिती देताना स्वरा भास्करने फहादसाठी एक खास नोटही शेअर केली आहे.स्वराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 2 मिनिटे आणि 4 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने सांगितले की या दोघांनी एकत्र अनेक चळवळींमध्ये आवाज कसा उठवला आणि त्यांचे नाते हळूहळू कसे बदलले आणि आज या टप्प्यावर येऊन पोहोचले. (Bollywood News)

स्वराने एक पोस्ट शेअर करत फहादसोबतची तिची भेट आणि प्रेमकहाणी याबद्दल बरेच काही सांगितलं आहे. 2019 मध्ये एका आंदोलनादरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर त्यांच्यातील संवाद वाढला.

तर फहादने स्वराला त्याच्या बहिणीच्या लग्नात बोलावले होते, मात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे स्वरा या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही, मात्र तिने फहादच्या लग्नाला नक्की हजर राहण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा कोणास ठाऊक होते की एके दिवशी तोच फहाद तिचा जीवनसाथी बनेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT