Sunny Leone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone: २४०० कोटी रुपयांचा घोटाळा; सनी लिओनीला CIDची नोटीस

Sunny Leone: कर्नाटकातील 2400 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्री सनी लिओनला CIDची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र तिच्यावर लवकरच चौकशी करण्यात येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Sunny Leone: कर्नाटकातील तब्बल 2400 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासादरम्यान अभिनेत्री सनी लिओनचे नाव समोर आल्याने मोठी चर्चा रंगली आहे. कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) सनी लिओनला नोटीस बजावून काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मागवली आहे. मात्र, या प्रकरणात सनी लिओन आरोपी नसून तिच्याकडून केवळ चौकशीसाठी माहिती घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हा संपूर्ण घोटाळा ‘शिवम असोसिएट्स’ या संस्थेशी संबंधित असून, मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याने हजारो गुंतवणूकदारांकडून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सुमारे 40 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांकडून 2400 कोटींचा निधी जमा करण्यात आला होता.

तपासादरम्यान काही गुंतवणूकदारांचा पैसा चित्रपटसृष्टीत वळवण्यात आल्याचा संशय CIDला आहे. याच पार्श्वभूमीवर सनी लिओनची चौकशी केली जाणार आहे. अहवालानुसार, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट चॅम्पियन मधील एका विशेष गाण्यासाठी सनी लिओनला सुमारे 1 कोटी मानधन देण्यात आले होते. हा चित्रपट मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याने निर्मित केला होता. त्यामुळे ते पैसे कुठून आले हे समजून घेण्यासाठी CIDने तिच्याकडून माहिती मागितली आहे.

CID अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सनी लिओनने कोणताही गैरप्रकार केल्याचा पुरावा सध्या समोर आलेला नाही. तिच्याकडे पाठवलेली नोटीस ही केवळ आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी आणि पैशांचा प्रवाह समजून घेण्यासाठी आहे. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याला अटक करण्यात आली असून त्याची 30 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT