Shweta Shinde Gives Strong Advice on Late Marriages Saam
मनोरंजन बातम्या

'पंचविशीत २-३ बीएचके फ्लॅट अन्... मुलीच्या कुटुंबाकडून भरमसाठ अपेक्षा चुकीचं', मराठी अभिनेत्रीचं लग्नाबाबत परखड मत

Shweta Shinde Gives Strong Advice on Late Marriages: अभिनेत्री श्वेता शिंदे हिने लग्न आणि वधू - वरांच्या अपेक्षांबाबत परखड मत व्यक्त केलं आहे.

Bhagyashree Kamble

लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र मिलन. मात्र, काळानुरूप लग्नाची ही व्याख्या बदलत चालली आहे. आजच्या घडीला तरूण - तरूणींच्या बऱ्याच अपेक्षा असतात. तरूणाकडे स्वत:चे घर आणि वाहन असावे, अशी बहुतांश तरूणींची इच्छा असते. तसेच तरूणांचीही काही अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्वरीत नकार देतात. तरूण तरूणींच्या वाढत्या अपेक्षांवर अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या युवा पिढीला उद्देशून तिनं एका पॉडकास्टमध्ये याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे.

अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणाली, 'वेळेत लग्न व्हायला हवं. वेळेत मुल होणं गरजेचं आहे. लग्न उशीरा, बाळ उशीरा, नंतर कॉम्प्लीकेशन्स येतात. संसार करायला लग्न करतो ना आपण. सध्या तरूणींच्या अपेक्षा आहेत, तरूणाचं २ बीएचके प्लॅट असावा, मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी हक्काचं घर असावं, अशी त्यांची इच्छा असते. पण वयाच्या २५ व्या वर्षी मुलाचा २ बीएचके, ३ बीएचके फ्लॅट कसा होऊ शकेल?', असा प्रश्न तिनं उपस्थित केला.

'२५ या वयात बहुतांश तरूणांची करीअरची सुरूवात असते. मुलाचं लग्न व्हावं म्हणून, आई वडिलांनी घर आपल्या मुलाच्या नावावर करावं, ही अपेक्षा असते. मग कुठलीतरी मुलगी हो म्हणते. मला हे समीकरणच समजलेलं नाही', असं श्वेता शिंदे म्हणाली. 'संसार करण्यासाठी आपण लग्न करतो. खांद्याला खांदा लावून दोघांनी घर घ्यायला हवे, आणि घराची वास्तूशांती करायला हवे. यातच खरी मज्जा आहे', असं शिंदे म्हणाली.

'मुलीच्या आई वडिलांनीही विचार करावा, पंचवीशीत आपल्याकडे या गोष्टी होत्या का? याचाही आपण विचार करावा..निर्व्यसनी मुलगा, चांगला कमावणारा, चांगली नोकरी करणारा मुलगा हवा, ही अपेक्षा असू शकते. आदर करणारा नवरा पाहिजे, ही अपेक्षा असू शकते. पण या वयात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं, ही अपेक्षा थोडी चुकते', असं परखड मत श्वेता शिंदे हिने एका पॉडकास्टमध्ये मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT