मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Pragya Satavs Exit Signals Major Shift in Hingoli Politics: हिंगोलीत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का. काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा.
Pragya Satavs Exit Signals Major Shift in Hingoli Politics
Pragya Satavs Exit Signals Major Shift in Hingoli PoliticsSaam
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षातील विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी पक्षाला रामराम केला आहे. लवकरच सातव भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातव यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासाठी सातव विधानभवनात दाखल झाले होते. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला आहे.

एकेकाळी हिंगोली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, कालांतराने राजकीय समीकरणांमध्ये बदल होत गेले. गटबाजी, नेत्यांमधील नाराजी, याचा थेट फटका काँग्रेसला बसला. दरम्यान, अशातच हिंगोलीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. प्रज्ञा सातव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. १० वाजताच्या दरम्यान, त्या विधानभवनात दाखल झाल्या. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला.

Pragya Satavs Exit Signals Major Shift in Hingoli Politics
मोठी बातमी! क्रिडामंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार, नेमकं कारण काय?

प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रज्ञा सातव लवकरच भाजप पक्षात प्रवेश करतील अशी माहिती आहे. सातव यांच्या भाजप पक्ष प्रवेशामागे कोण आहे? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यामुळे हिंगोलीत भाजपची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.

Pragya Satavs Exit Signals Major Shift in Hingoli Politics
नेत्यांच्या फोडाफोडीवरून भाजप-शिवसेनेचा वाद पेटला, पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा, कल्याणमध्ये महायुतीत मिठाचा खडा

प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव या गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. २०१४ ते २०१९ या काळात राजीव सातव हे हिंगोलीचे खासदार होते. दरम्यान २०२१ साली त्यांचं आजारपणामुळे निधन झालं. दरम्यान, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून, सातव सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. मात्र, नुकतंच त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com