मोठी बातमी! क्रिडामंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार, नेमकं कारण काय?

Court Confirms Two-Year Sentence to Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ. शासकीय कोट्यातील सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम.

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची पुन्हा एकदा अडचणीत वाढ होणार आहे. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणात ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली २ वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रूपयांचा दंड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एम. बदर यांनी हा निकाल दिला असल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, या प्रकरणाचा थेट परिणाम त्यांच्या मंत्रिपदावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com