Shraddha Kapoor Dating Rumours Instagram/ @shraddhakapoor
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor Dating Rumours: श्रद्धा कपूर पडली प्रेमात , ‘तू झुठी मैं मक्कर’च्या लेखकाला करतेय डेट?

Shraddha Kapoor Dating News: सध्या श्रद्धा ‘तू झुठी मैं मक्कर’ च्या लेखकाला डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Shraddha Kapoor Dating Rumours

‘आशिकी २’ आणि ‘तू झुठी मैं मक्कर’ मधून श्रद्धा कपूर प्रचंड प्रकाशझोतात आली आहे. श्रद्धा कपूर कायमच सोशल मिडीयावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या श्रद्धा ‘तू झुठी मैं मक्कर’ च्या लेखकाला डेट करत असल्याची सध्या चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्रद्धा कपूरचे नाव आदित्य रॉय कपूरसोबत जोडले गेले होते. काही रिपोर्ट्सनुसार, आशिकीच्या शुटिंगवेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर अभिनेत्रीचे नाव फोटोग्राफर रोहित श्रेष्ठसोबत जोडले जात होते. अनेकदा श्रद्धा आणि रोहित एकत्र स्पॉटही झाले होते, त्यांच्या रिलेशनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा बरीच चर्चा झाली होती. आता या चर्चांनंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या अभिनेत्री बॉलिवूड स्क्रिप्ट राईयर राहुल मोदीला डेट करत असल्याची चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना आपले रिलेशन प्रायव्हेट ठेवायचे आहे फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, ‘तू झुठी मैं मक्कर’च्या शूटिंगदरम्यान श्रद्धा आणि राहुलची जवळीक वाढली. दोघांनीही रिलेशनबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या बातमीत कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

श्रद्धा कपूर अखेरची रणबीर कपूरसोबत ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटात दिसली होती. यासोबतच आता लवकरच श्रद्धा राजकुमार रावच्या ‘हॉरर स्त्री २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अमर कौशिक यांनी केली आहे. तर जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजनने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘हॉरर स्त्री २’मध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी सारख्या बड्या सेलिब्रिटींची फौज चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

Municipal Elections Voting Live updates : भाजप उमेदवाराने 600 ते 650 बोगस मतदार आणल्याचा अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीचा आरोप

Homemade Lip Oil : लिप बाम विसरा ओठांना सॉफ्ट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा लिप ऑईल

Pomegranate Skin Benefits : डाळिंबाच्या रसाने चेहरा सोन्यासारखा चमकेल, फक्त फॉलो करा 'या' ३ स्टेप्स

कार्यकर्ते पैसे घेऊन आले, कुटुंबाने तोंडावर नोटा उधळत हाकलून लावले VIDEO

SCROLL FOR NEXT