Shilpa Shinde canva
मनोरंजन बातम्या

Shilpa Shinde: पत्रिका छापल्यानंतर मोडलं होतं लग्न, आता ४७ व्या वर्षी 'अंगुरी भाभी' या अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ

Shilpa Shinde Soon To Get Married: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. शिल्पाने वयाच्या ४७ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री शिल्पा शिंदे म्हणजेच सर्वांची लाडकी अंगुरी भाभी सध्या 'खतरो के खिलाडी' या स्टंट रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये शिल्पा स्टंटसोबत मस्तीदेखील करताना दिसत आहे. शिल्पाची बबली स्टाईल चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. आपल्या अभिनयासह शिल्पा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान शिल्पाच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागून होती. मात्र आता खुद्द अभिनेत्रीने तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केलाय. शिल्पाचं वय ४७ असून ती अजूनही लग्न केलं न्हवतं मात्र आता तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पा कोणाशी लग्न करणार असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

शिल्पाने काही वर्षांपूर्वी रोनित राजसेूत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांचा साखरपुडा होऊन लग्नाचे कार्ड देखील छापले होते. परंतु काही कारणांमुळे शेवटच्या क्षणी त्यांचे लग्न मोडलं. शिल्पाचं नातं तुटल्यानंतर तिने लग्नाचा विचार सोजला होता. पण आता काही वर्षानंतर शिल्पाने मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतला आहे.

शिल्पाचं नाव सध्या अभिनेता करणवीर मेहरा याच्यासोबत जोडले जात आहे. करणवीरचे यापूर्वी दोन लग्न झाले होते. मात्र काही कारणांमुळे त्याच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्यामुळे त्याचे घटस्फोट दोन झाले. आता 'खतरो के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पा आणि करण एकत्र दिसत आहेत. याच शोमध्ये त्यांनी प्रपोज केलं आणि त्यांनी लग्न करणार असल्याचे संकेत दिलेत. एका स्टंट दरम्यान करण शिल्पाला म्हटला की, "आपण जर हा टास्क जिंकलो तर आपण लग्न करुया."

शो दरम्यान करणने जेव्हा शिल्पाला प्रपोज करत 'आय लव्ह यू' म्हटलं त्यावेळी शिल्पाने त्याला लाजत उत्तर दिलं की, "नाही ,नको, कॉर्डिनेशनमध्ये गडबड होईल." त्यावर करण लगेच म्हणतो की, "काही नाही होणार काळजी नको करूस". शिल्प आणि करण एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. 'भाभाजी घर पर है' या मालिकेच्या माध्यामातून शिल्पाला प्रसिद्धी मिळाली होती. या शोमधील अंगुरीच्या बोलण्याची शैली चाहत्यांना खूप आवडत होती. आज देखील शिल्पाला अनेकजण अंगुरी भाभी म्हणतात.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

SCROLL FOR NEXT