Actress Shamim Akbar Alli Alleges Autorickshaw Driver Assaulted Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Assaulted: मुंबईमध्ये रिक्षाचालकाने अभिनेत्रीवर केला हल्ला; कलाविश्वात खळबळ

Television Actress Assaulted: अभिनेत्री शमीम अकबर अली हिच्यावर मिरा रोड परिसरात एका रिक्षाचालकाने गैरवर्तन आणि जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्रीने या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Assaulted: टेलिव्हिजन अभिनेत्री शमीम अकबर अली हिच्यावर मिरा रोड परिसरात एका ऑटोचालकाने गैरवर्तन आणि जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना अभिनेत्रीच्या पाच वर्षांच्या मुलीसमोर घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेत्रीने या प्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शमीम अकबर अलीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, शनिवारी दुपारी ती जिममधून बाहेर पडल्यावर मिरा रोडवरील कनकिया भागात आपल्या मुलीसोबत शाळेकडे जाण्यासाठी ऑटो घेतला. तिने ऑटोचालकाला शाळेजवळ थांबवण्यास सांगितले असता अचानक चालक चिडला आणि तिच्याशी उर्मटपणे बोलू लागला. शमीम म्हणाल्या, “मी ऑटोचालकाला शांत राहायला सांगितले, पण त्याने माझा उजवा हात पकडला आणि जबरदस्तीने ओढले. हा प्रकार माझ्या पाच वर्षांच्या मुलीसमोर झाला.”

या अचानक घडलेल्या घटनेने घाबरलेल्या अभिनेत्रीने त्वरित ऑटोतून बाहेर पडून जवळच्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी संबंधित चालकाचा शोध सुरू केला असून त्याच्यावर हल्ला आणि महिलेशी गैरवर्तन केल्याच्या कलमांखाली लवकरच गुन्हा दाखल करणार आहेत.

शमीम म्हणाली की, “मी आजही त्या घटनेने हादरले आहे. माझ्या मुलीच्या डोळ्यासमोर हे सगळं झालं. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून कोणी पुन्हा महिलांना किंवा मुलांना घाबरवण्याचं धाडस करणार नाही.” दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, ऑटोचालकाचा शोध सुरू असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी खात्री दिली आहे की, दोषी सापडताच त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT