sara ali khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan At Amarnath Yatra : जय बाबा बर्फानी... सारा अली खान पोहोचली अमरनाथ यात्रेला

Sara Ali Khan Amarnath Yatra Video Viral : भिनेत्री सारा अली खान अमरनाथ यात्रेला गेली आहे.

Pooja Dange

Sara Ali Khan Share Glimpse Of Amarnath Yatra : अभिनेत्री सारा अली खान अमरनाथ यात्रेला गेली आहे. तेथील व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी अमरनाथचे मंदिर भक्तांसाठी खुले झाले आहे. २९ जून रोजी जम्मू येथून यात्रेला सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेचा व्हिडिओ सारासह एएनआय या वृत्तसंस्थेने देखील शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये सारा मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या टेकड्यांवरून चालताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला तिचे बॉडीगार्ड देखील आहेत. साराने सियान रंगाचे जॅकेट आणि पॅन्ट घातली आहे. तर डोळ्यावर स्कार्फ घेतला आहे.

तिचा या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी तिचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. सरांचे कौतुक करताना एका नेटकाऱ्याने लिहिले आहे, अमृता सिंगने मुलीला खूप उत्तमरीत्या वाढवले आहे. (Latest Entertainment News)

साराने तिच्या इंस्टाग्रामवर देखील तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती vlog करताना दिसत आहे. आपल्यासोबत असलेल्या यात्रेकरूंची ओळख करून देत साराने आपण अमरनाथ यात्रेच्या शेवटपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगितले आहे. तिने अमरनाथची मंदिराच्या जवळ असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये ती महादेवाचा जयजयकार करताना दिसत आहे.

साराची काश्मीर ट्रिप

सारा अली खानने अलीकडेच तिच्या काश्मीरच्या ट्रीपची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली. सारा तिचे अनके फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सारा तंबूत थंडी वाजत असताना चहाचे घोट घेत होती, तिच्या मांडीत एक गोंडस शेळी होती.

साराने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "जेव्हा आत्मा समाधानी असतो आणि पाय दुखत असतात, बकरी आणि लहान मुलांशी मैत्री केली, मग चहा घेतली जी मला आवडते."

साराचे प्रोजेक्ट

सारा शेवटची विक्की कौशलसोबत जरा हटके जरा बचके मध्ये दिसली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये अनुराग बसूच्या मेट्रो इन डिनोचा समावेश आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

साराने 2018 मध्ये रिलीज झालेल्या केदारनाथमध्ये दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सिम्बा, लव आज कल 2, कुली नंबर 1, अतरंगी रे आणि गॅसलाइट सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT