Ruchi Gujjar Hits Director Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ruchi Gujjar : चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये राडा; अभिनेत्रीने दिग्दर्शक-निर्मात्याला चप्पलने मारले, पाहा VIDEO

Ruchi Gujjar Hits Director: मुंबईतील सिनेपोलिस थिएटरमध्ये, सो लॉन्ग व्हॅलीच्या स्क्रीनिंग दरम्यान अभिनेत्री रुची गुर्जरने निर्माता-अभिनेता मान सिंग यांना चप्पलने मारहाण केली.

Shruti Vilas Kadam

Ruchi Gujjar Hits Director: मुंबईतील एका थिएटरमध्ये 'सो लॉन्ग व्हॅली' या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एक नाट्यमय दृश्य घडले, यावेळी अभिनेत्री रुची गुज्जरने चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता मान सिंग यांना चप्पलने मारहाण केली, ज्यामुळे सिनेपोलिसमध्ये गोंधळ उडाला. आता सोशल मिडियावर या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून त्यांच्या मधील आर्थिक अडचणींमुळे तीने असे केले आहे.

व्हिडिओमध्ये, रुची निर्मात्यांशी वाद घालताना ओरडताना दिसून येत आहे. त्यानंतर तिने आपला रागावरील नियंत्रण सोडून एका निर्मात्याला तिच्या चप्पलने मारहाण केली. असे दिसते की ती निषेध करण्याच्या उद्देशाने थिएटरमध्ये आली होती. चित्रपटाच्या प्रिमियरदरम्यान, जिथे निर्माते उपस्थित होते तिथे जाऊन तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. याचसह तिच्यासोबत आलेल्या लोकांच्या हातात निर्मात्यांचे फोटो असलेले फलक घेतले होते, ज्यांच्या चेहऱ्यावर लाल क्रॉसचे चिन्ह होते. तर काही पोस्टर्समध्ये निर्माते गाढवांवर बसलेले होते.

प्रकरण काय आहे?

रुचीच्या म्हणण्यानुसार, चौहानने गेल्या वर्षी तिच्याशी संपर्क साधला होता आणि दावा केला होता की तो सोनी टीव्हीवर लवकरच प्रसारित होणाऱ्या एका हिंदी टेलिव्हिजन मालिकेची निर्मिती करत आहे. "त्याने मला सह-निर्माता म्हणून जोडण्याची ऑफर दिली आणि प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे देखील पाठवली. ऑफरवर विश्वास ठेवून, रुचीने जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान तिने तिच्या कंपनी, एसआर इव्हेंट अँड एंटरटेनमेंटकडून २५ लाख रुपये चौहानच्या के स्टुडिओच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. पण, सांगितलेल्या प्रकल्पाचे काम कधीच सुरू झाला नाही.असे ती म्हणाली.

तिच्या म्हणण्यानुसार, हा निधी मालिकेसाठी नाही तर 'सो लॉन्ग व्हॅली' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आला होता. पण "२७ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती मला मिळाली तेव्हा मी त्याला माझे पैसे आता परत करण्यास सांगितले, ज्यावरून त्याने मला धमकावण्यास सुरुवात केली," असे आरोप तिने केले. मुंबई पोलिसांनी ३६ वर्षीय चौहानविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ३१८(४), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत अभिनेत्री रुचिओला २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT