Rinku Rajguru Watched Marathi Drama Niyam V Ati Lagoo Instagram
मनोरंजन बातम्या

Sankarshan Karhade Post: ‘नाटक पाहून हसली, रडली, कौतुक करून गेली...’; ‘नियम व अटी लागू’च्या शोनंतर संकर्षण कऱ्हाडेची रिंकू राजगुरूसाठी खास पोस्ट

Rinku Rajguru Watched Marathi Play: अकलूजला झालेल्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या प्रयोगाला अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या परिवारासोबत हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या आई- वडिलांनीही अभिनेत्याच्या कामाचे कौतुक केले आहे.

Chetan Bodke

Rinku Rajguru Watched Marathi Drama Niyam V Ati Lagoo

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिका, चित्रपट आणि नाटकांतून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहचला आहे. संकर्षण कायमच आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचे मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. संकर्षण फक्त अभिनयच नव्हे तर कविता, सूचसंचालनामुळेही चर्चेत असतो. सध्या संकर्षण ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे कमालीचा चर्चेत आहे. सध्या अभिनेता या नाटकामुळे महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. नुकतंच अभिनेत्याच्या ह्या नाटकाचा अकलूजला प्रयोग झाला. (Marathi Actors)

त्याच्या ह्या नाटकाला चाहत्यांनी तर भरभरून प्रतिसाद दिलाच, पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. अकलूजला झालेल्या नाटकाच्या प्रयोगाला अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या परिवारासोबत हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या आई- वडिलांनीही अभिनेत्याच्या कामाचे कौतुक केले आहे. नुकतंच यासंदर्भात संकर्षणने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो “काल अकलूजचा प्रयोग जोरदार झाला. प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतीसाद मिळाला almost Houseful होता… आणि काल प्रेक्षकांमध्ये स्पेशल गेस्ट पण होती… रिंकू राजगुरू.” 

“मी अकलूजला येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली, “माझ्या शहरांत तुझं स्वागत आहे... शहरांत काहीही लागलं तरी हक्काने सांग म्हणाली...” आई बाबांना घेऊन आली... प्रयोग पाहून हसली, रडली, कौतुक करुन गेली... तिचा सैराट आला तेंव्हा ‘आम्ही सारे खवय्ये’ मध्ये पाहूणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली. आता चांगले चांगले सिनेमे करते… लोकप्रियता तर काय विचारायलाच नको… पण तरीही स्वतःहून कळवून, येऊन, भेटून, विचारपुस करुन, कौतुक करुन गेली...” (Social Media)

“आणि विशेष म्हणजे “मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले ती तुझ्यासोबत “खवय्ये” मध्ये असं पण म्हणाली.. छान वाटलं ह्या सगळ्या तिच्या वागण्या बोलण्यात शांतता, स्थिरता, समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती… वचवच, माज, नखरे काही नाही… थँक्यू रिंकू राजगुरू तुला खूप शुभेच्छा भेटत राहु... आणि हो सग्गळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कल्लाकारांचे... त्यांच्या मनांत एकच भाव होता… ‘आरची आली आर्ची...’ ” दरम्यान, ‘नियम व अटी लागू’ नाटकाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं असून नाटकात प्रमुख भूमिकेत संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री अमृता देशमुख, प्रसाद बर्वे मुख्य भूमिकेत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT