Ali Fazal-Richa Chadha Wedding Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ali Fazal-Richa Chadha Wedding : मिर्झापूर फेम गुड्डू भैया लवकरच लग्नबंधनात अडकणार

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ali Fazal-Richa Chadha Wedding Update | मुंबई : बॉलिवूडमध्ये रोज नवीन कपलची चर्चा होत असते. काहींचे लॉंग रिलेशनशिपनंतर लग्न होतं, तर काही कपलचं अचानक ब्रेकअप होतं. बी-टाऊनमध्ये(Bollywood) रिलेशनशिप हा प्रचंड चर्चेचा विषय आहे. हल्ली अशाच एका कपलविषयी सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चढ्ढा(Richa Chadha) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वृत्तानुसार, बॉलिवूडचे हे कपल पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

रिचा चढ्ढा आणि अली फजल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे लग्न २०२० मध्ये होणार होते, मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचे लग्न दोन वर्ष पुढे ढकलले गेले. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना रिचा चढ्ढाने तिच्या लग्नाबाबत एक हिन्ट दिली आहे. तिने मुलाखतीत खुलासा केला की ती यावर्षी २०२२ मध्ये अलीसोबत लग्न करणार आहे. आता या कपलच्या लग्नाचे अपडेट्स त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाहीत.

माहितीनुसार, या कपलच्या लग्नाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. रिचा आणि अली दोघेही यावर्षी सप्टेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांचे कुटुंब खूप आनंदी असून हे कपल मुंबई आणि दिल्ली या दोन ठिकाणी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन करणार आहेत. ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अली आणि रिचा यांनी २०१९ मध्ये 'फुकरे' या सिनेमामध्ये एकत्र काम केले आणि तेव्हाच हे कपल एकमेकांच्या प्रेमात पडले. सात वर्षे डेटिंग केल्यानंतर अलीने २०१९ मध्ये रिचाला प्रपोज केल्याचे सांगितले जाते, या कपलने व्हेनिसमध्ये अली फजलच्या हॉलिवूड सिनेमा 'व्हिक्टोरिया अँड अब्दुल'च्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये त्यांचे नाते अधिकृत जाहीर केले.

अली फजल शेवटचा अभिनेत्री गॅल गॅडोट आणि अभिनेता टॉम बेटमनच्या हॉलिवूड सिनेमा 'डेथ ऑन द नाईल'मध्ये दिसला होता. अली सध्या त्याची बहुप्रतीक्षित वेब सीरीज 'मिर्झापूर'-३ च्या तयारीत व्यग्र आहे. तर रिचा पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी' आणि 'फुकरे ३' मध्ये तिच्या भोली पंजाबनच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT