Rhea Chakraborty Comeback Saam Tv
मनोरंजन बातम्या

Roadies Season 19: रिया चक्रवर्तीच्या कमबॅकमुळे सुशांतचे चाहते नाराज, म्हणाले - 'यापुढं रोडीज बघणं बंद करणार'

Rhea Chakraborty Comeback In Roadies Season 19: तब्बल तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्ती लवकरच आपल्या करिअरमध्ये कमबँक करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rhea Chakraborty In Roadies: बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर गेली अनेक वर्षे चर्चेत राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशांतच्या प्रकरणामुळे रिया छोट्या पडद्यापासून अनेक वर्षे दूर होती. पण आता तब्बल तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्ती लवकरच आपल्या करिअरमध्ये कमबँक करणार आहे.

एमटीव्हीवरील (MTv) प्रसिद्ध रियालिटी शो 'रोडीज 19' (Roadies Season 19) च्या माध्यमातून रिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे रियाच्या कमबॅकमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपुतचे चाहते संतप्त झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर रियाच्या रोडिजमधील एन्ट्रीवर संताप व्यक्त केला आहे.

'रोडीज 19' या शोमध्ये रिया गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रोमो व्हिडओ शेअर करण्यात आला आहे. त्याचसोबत रियाने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रियाचा जबरदस्त लूक आणि धमाकेदार एन्ट्री पहायला मिळत आहे.

'रोडीज कर्म या कांड'च्या प्रोमो व्हिडिओमध्ये रिया ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश लूक दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की,'तुम्हाला काय वाटलं होतं की मी परत येणार नाही, मी घाबरुन जाईल? पण घाबरण्याची वेळ दुसऱ्याची आहे. ऑडिशनला भेटूया.' रिया चक्रवर्ती या शोमध्ये प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यासोबत 'गँग लीडर'च्या भूमिकेत दिसणार आहे.

एकीकडे रिया चक्रवर्तीच्या या कमबॅकमुळे तिचे चाहते आनंदी झाले आहेत तर दुसरीकडे रोडीजमध्ये रिया दिसणार असल्यामुळे सुशांत सिंह राजपुतच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत रियावर भडकले आहेत. एका युजरने लिहिले की, 'मला रोडीज हा शो खूप आवडतो, पण आता रियामुळे तो पाहणं मी बंद करणार आहे.' दुसऱ्या युजरने 'रोडीजवाल्यांचं डोकं फिरलंय का? त्यांनी हिला का घेतलं?', असा सवाल केला आहे.

तर आणखी एका युजरने 'सर्वजण या शोसाठी खूप उत्सुक होते. पण निर्मात्यांनी हिचा चेहरा दाखवून सर्वांचा मूड खराब केला', अशी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी तर हा शो फ्लॉप ठरणार असल्याचे देखील मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्ती 'मेरे डॅड की मारुती', 'सोनाली केबल', 'दोबारा', 'हाफ गर्लफ्रेंड', 'बँक चोर', 'चेहरे' आणि 'जलेबी' या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. रियाला 'जलेबी' चित्रपटातून सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Tips: ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

SCROLL FOR NEXT