New Song: प्रेमासाठी खंडोबाला साकडं.. 'मन झालं मल्हारी मल्हारी..' गाणं ऐकून तुम्हीही धराल ठेका

Man Zhala Malhari New Marathi Song: 'मन झालं मल्हारी' या गाण्यातून एका प्रेमी युगुलाची गोड कथा उलघडण्यात आली आहे.
New Song From Man Zhala Malhari
New Song From Man Zhala MalhariSaam TV
Published On

Man Zhala Malhari Song From Marathi Movie TDM: चित्रपटातील गाणी हा भारतीय चित्रपटसृष्टीचा गाभा आहे. भारतात चित्रपटातून गोष्ट सांगितली जाते. गाण्याच्या माध्यमातून पडद्यावर साकारलेली कथा अनेक काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते. असे अनेक चित्रपट आहेत जे हिट झाले नाहीत पण त्यांची गाणी मात्र आजही प्रेक्षक गुणगुणत असतात.

सध्या 'टीडीएम' या मराठी चित्रपटातील गाण्याची चर्चा आहे. 'मन झालं मल्हारी' असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यातून एका प्रेमी युगुलाची गोड कथा उलघडण्यात आली आहे. हे रोमँटिक गाण्याची कोणलाही सहज भुरळ पडू शकते.

'मन झालं मल्हारी' या गाण्यातून प्रेमाची निरागसता दिसून येत आहे. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने या गाण्यातून दाखविण्यात आलेले हे नायक नायिकेमध्येल प्रेम आपल्या मानला भिडते. त्यांची काहीही आपल्याला आपलीशी वाटते.

New Song From Man Zhala Malhari
Bholaa Box Office Collection: साऊथच्या 'दसरा' पुढे अजयचं निघालं दिवाळं; 'भोला' करणार का १०० करोडचा आकडा पार?

प्रेयसी आणि प्रियकराच एकमेकांवर असलेलं प्रेम अगदी अचूक हेरत या गाण्यातून मांडलंय. गाण्याच्या शब्दांमध्येच इतका जिव्हाळा आहे की आपसूक हे गाणं ओठावर रेंगाळतय. तर या गाण्यातील डान्स देखील तुम्हाला तितकाच आवडेल. अगदी सद्या स्टेप 'मन झालं मल्हारी' या गाण्यात पाह्यला मिळत आहे. जेणेकरून कोनोही सहज या गाण्यावर थिरकले.

'मन झालं मल्हारी' या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार वैभव शिरोळे याने पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी लिहिल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि वैभव शिरोळे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चारचाँद लावले आहेत.

'टीडीएम' चित्रपटातील नवखे चेहरे म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदीवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. भाऊराव कऱ्हाडेंची यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत.

'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com