Bholaa Box Office Collection: साऊथच्या 'दसरा' पुढे अजयचं निघालं दिवाळं; 'भोला' करणार का १०० करोडचा आकडा पार?

Dasara 11th Day Box Office Collection: 'भोला' चित्रपटासोबत प्रदर्शित झालेला साऊथ चित्रपट 'दसरा'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन जास्त आहे.
Bholaa and Dasara Box Office Collection of 11th day
Bholaa and Dasara Box Office Collection of 11th day Saam Tv

Bhola and Dasara Collection: अजय देवगणचा 'भोला' चित्रपट ३० मार्च, २०१३ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या फर्स्ट लूक, टीझर आणि ट्रेलरला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. परंतु चित्रपटाकडे मात्र प्रेक्षकांनी दुर्लक्ष केले. चित्रपटाने आतापर्यंत ७० करोड रुपयांची कमाई केली आहे.

'भोला' चित्रपट भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी चित्रपट हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाने ११ व्या दिवशी ३ करोड ३० लाख रुपयांची कमाई केली आहे.

Bholaa and Dasara Box Office Collection of 11th day
Allu Arjun's Pushpa 2: आदिपुरुषनंतर आता 'पुष्पा 2'च्या पोस्टरवरून वाद; 'हा देवांचा अपमान आहे' म्हणत केली टीका

पहिल्या दिवशी 'भोला' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११ करोड २ लाखांची कमाई केली होती. थ्रीडीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'भोला' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या रविवारी आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे १३ करोड ४८ लाख कमावले होते. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण ५९ करोड ९८ लाखांचे कलेक्शन केले.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला १०० करोड कमविण्याच्या यश मिळाले असते. पण त्यासाठी या चित्रपटाला आणखी एक आठवडा बॉक्स ऑफिसवर टॅग धरून राहावे लागणार होते. या चित्रपटाचे कलेक्शन ७० करोड ६९ लाख होते. त्यामुळे चित्रपटाला १०० करोडचा आकडा पार करता आला असता.

'भोला' चित्रपटाची कमाई कमी आणि खूप हळूहळू सुरू होती. पण या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेला साऊथ चित्रपट 'दसरा'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन जास्त आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११व्या दिवशी २ करोड २५ लाखांचे कलेक्शन केले आहे. तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 'भोला' पेक्षा जास्त आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ७५ करोड, २० लाखांचे कल्ककलेक्शन केले आहे.

'भोला' आणि 'दसरा' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. दोन्हीही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन धीम्या गतीने होत आहे. 'दसरा' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 'भोला' पेक्षा जास्त आहे.

'भोला' चित्रपट साऊथ चित्रपट 'कैथी'चा ऑफिशल रिमेक आहे. 'भोला' दिग्दर्शन अजय देवगणने केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com