Mardaani 3 Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mardaani 3: हातात बंदूक आणि निर्भिड चेहरा, शिवानी शिवाजी रॉयची होणार री-एन्ट्री; 'मर्दानी ३'चा पहिला लूक रिलीज

Mardaani 3 Release Date: मर्दानी 3 मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तब्बल १० वर्षानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Mardaani 3 Release Date : बॉलिवूड अभिनेत्री रानी मुखर्जी पुन्हा एकदा 'मर्दानी' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात म्हणजेच 'मर्दानी 3' मध्ये, धाडसी पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतणार आहेत. यशराज फिल्म्सने नुकतेच या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि रिलीज डेट जाहीर केला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करत आहेत, यापूर्वी त्यांनी 'बँड बाजा बारात', 'गुंडे', 'सुलतान' आणि 'टायगर 3' सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 'मर्दानी 3' मध्ये रानी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहेत, जी एक निर्भय पोलिस अधिकारी आहे .

'मर्दानी' फ्रँचायझीची सुरुवात २०१४ मध्ये झाली, यामध्ये रानी मुखर्जीने पहिल्यांदा शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली होती. त्यानंतर २०१९ मध्ये 'मर्दानी 2' प्रदर्शित झाला, यामध्ये तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. आता, 'मर्दानी 3' मध्ये ती पुन्हा एकदा याच भूमिकेत दिसणार आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये रानी मुखर्जी पोलिस वर्दीत, हातात बंदूक घेऊन, गंभीर लूकमध्ये दिसत आहेत. या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. 'मर्दानी 3' हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी म्हणजेच होळीच्या काळात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT