Zee Chitra Gauarav 2025 shreyash talpade and purva kaushik Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zee Chitra Gauarav 2025: 'केसाला धक्का...'; पुष्पाभाऊचा स्वॅग अन् शिवाचा डायलॉग, श्रेयस तळपदेचा 'तो' बॅकस्टेज VIDEO व्हायरल

Zee Chitra Gauarav: झी चित्र पुरस्कार सोहळ्यातील एका खास परफॉर्मेंसचा किस्सा शिवानं म्हणजेच, पूर्वा कौशिकनं सांगितला. झी चित्र पुरस्कार या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shruti Vilas Kadam

Zee Chitra Gauarav 2025: ‘झी चित्र गौरव’ पुरस्काराचं यंदाचं २५ वं वर्ष आहे. तेव्हा यावर्षी प्रेक्षकांसाठी या पुरस्कार सोहोळ्यात अनेक सरप्राइजिंग एलेमेंट्स असणार आहेत. याच पुरस्कार सोहळ्यातील एका खास परफॉर्मेंसचा किस्सा शिवाने म्हणजेच पूर्वा कौशिकने सांगितला आहे.

"झी चित्र गौरव पुरस्कार आपलं २५ वं वर्ष साजरं करत आहे. मला त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली खूप भारी वाटलं. या सोहळ्यात शिवा म्हणून मला डांस करण्याची संधी मिळाली आणि ते ही श्रेयस तळपदे यांच्या सोबत. मी लहान असताना त्यांचा इकबाल सिनेमा पहिला होता आणि त्यासोबत बरेच सिनेमे आणि मालिकाही पहिल्या आहेत. माझ्यासाठी तो मोठा सेलेब्रिटी आहे उत्तम कलाकार आहे. आम्ही २ वेळा टेक्निकल केली आणि मग वन टेक परफॉर्म केलं.

एक किस्सा मला सांगायला आवडेल असं म्हणत पूर्वा म्हणाली, हे तर सर्वाना माहिती आहे की श्रेयसने पुष्पा फिल्मच्या हिंदी व्हर्जन मध्ये आवाज दिला आहे, जेव्हा मी बॅक स्टेज श्रेयसला भेटले तेव्हा मी त्याला शिवा म्हणून एक विनंती केली की शिवाचा एक डायलॉग बोलशील का "केसाला धक्का, कपाळाला बुक्का" आणि त्यांनी पुष्पांच्या आवाजात तो डायलॉग म्हणून दाखवला. जे मला भारी वाटलं.

२५ वं वर्ष आहे तेव्हा पार्टी तर होणारच! 'झी चित्र गौरव २०२५' पुरस्काराच्या अविस्मरणीय क्षणांचे आणि दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार व्हा. ८ मार्च रोजी संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर आणि शिवा ही मालिका नक्की पाहा सायंकाळी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT