Priyanka Chopra with Nick and Malati Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: प्रियंकाला का उचलावे लागले सरोगेसीसारखं पाऊल, अभिनेत्रीने केला खुलासा

जानेवारी २०२२ साली जेव्हा प्रियांकाला मुलगी झाली हे कळेल तेव्हा अनेकांनी तिला ट्रोल केले.

Pooja Dange

Priyanka Chopra Spoke About Her Surrogacy: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास बॉलिवूड नाहीतर हॉलिवूडचे देखील फेव्हरेट कपल आहे. जानेवारी २०२२ साली जेव्हा प्रियांकाला मुलगी झाली हे कळेल तेव्हा अनेकांनी तिला ट्रोल केले. तिची मुलगी मालती सरोगेसीच्या मदतीने झाली आहे. प्रियंकाने हे पाऊल का उचलले यावर एका मुलाखतीत सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीमध्ये सांगितले की, 'मला मेडिकल कॉम्प्लिकेशन होते, त्यामुळे मी हे पाऊल उचलले. आमच्यासाठी असे करणे गरजेचे होते. प्रियंकाने मुलगी मारुतीच्या जन्माची घोषणा करताच अनेकांनी तिला ट्रोल केले होते.

सोशल मीडिया युजर्सना प्रियंकाने सरोगेसी केल्याचे पटले नव्हते. तिच्याविषयी अनेक गीष्टी बोलल्या गेल्या. 'दोघेही बिजी असल्यामुळे त्यांना बाळ होत नाही' असे देखील सोशल मीडिया युजर्सने म्हटले होते.

तुम्हाला माझ्याविषयी माहित नाही, तुम्हाला माहित नाही की मला काय सहन करावं लागलं आहे. मला माझी किंवा माझ्या मुलीची मेडिकल हिस्ट्री लोकांसमोर नाही आणायचा. याच अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी रचाल पसरवलं, असे प्रियंकाने म्हटले आहे.

प्रियांका आणि निक यांची मुलगी मालती प्री-मॅच्युर जन्माला आली. ब्रिटिश वोगने दिलेल्या माहितीनुसार, मारुतीचा जन्म सहाव्या महिन्यातच झाला होता. प्रियांका आणि निकला मालती वाचेल की नाही याची देखील शास्वती नव्हती. मुलीच्या जन्मानंतर तीन महिने दोघे कॅलिफोर्नियातील रेडी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये जात होते. त्या हॉस्पिटलमध्ये मालती अॅडमिट होती.

प्रियंकाने सांगितले की, 'माझी मुलगी जेव्हा या जगात अली तेव्हा ऑपरेटिंग रूममध्ये होती. ती खूप छोटी होती. माझ्या हातापेक्षा सुद्धा छोटी होती. मी पाहिलं इंटेसिव्ह केअरमध्ये नर्स काय करतात. देवाचं काम करतात त्या. निक आणि मी तिथीचे होते जेव्हा त्या मालतीला मशीनशी जोडत होत्या. मला कळतच नाही की, त्या छोट्या शरीरातील अवयव त्यांना कसे सापडले आणि त्यांनी ते मशीनशी कसे जोडले. आम्ही प्रत्येक दिवस तिच्या सोबत घालवायचो. ती कधी माझ्या कुशीत तर कधी निक च्या कुशीत असायची. मला वाटलं नव्हतं ती वाचेल.

प्रियंकाने म्हणाली की, 'मुलगी मालतीसाठी मी नेहमीच काळजीत असायचे. पहिल्यांदा जेव्हा मी तिला भरवले होते तेव्हा ते तिच्या घशात अडकले होते. मला वाटलं मी तिचा जीव घेतला. कुटुंबियांनी मला समजावले. त्यांनी सांगितले की, लहान मुलांच्या घशात कधी कधी जेवण अडकते. परंतु मी --- आई असल्याने माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. मला यातून पुढे जायचे आहे आणि मी पुढे जात आहे.'

'मालती जेव्हा जेवत असते तेव्हा तिच्या आजूबाजूला जवळजवळ सात लोक असतात. माझी आई आणि मामा. निकचा भाऊ त्याचे आई-वडील.' जेव्हा प्रियंकाला विचारले मालती कशी दिसते, तेव्हा तिने सांगितले की, ' अनेकजण म्हणतात की ती निक सारखी दिसते, पण आला असे वाटत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT