सध्या देसी गर्ल प्रियंका चोप्रा मामि फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतामध्ये आली आहे. ग्लोबल स्टार प्रियंका नेहमीच आपल्या फॅशनमुळे, अभिनयामुळे तर कधी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत राहते. नुकतंच प्रियंकाने बॉलिवूडमधल्या महिला केंद्रीत चित्रपटांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला कंगना रनौतचा ‘तेजस’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलाय. त्या चित्रपटाबद्दल तिने वक्तव्य केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'तेजस' हा एक महिला-केंद्रित चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौतने मुख्य भूमिका साकारली आहे. कंगनाने इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाचेही जोरदार प्रमोशन केले. चाहत्यांमध्ये तिने या चित्रपटाबद्दलही प्रचंड आतुरता निर्माण केली. परंतु जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला, त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटाला पाठ फिरवली. कंगना रनौतचे अनेक चित्रपट एकामागोमाग फ्लॉप होत आहेत. त्यासोबतच सध्या बॉलिवूडमध्ये महिला केंद्रीत चित्रपटांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ई- टाईम्सच्या वृत्तानुसार, मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये मीडियासोबत संवाद साधताना, कंगनाने तिच्या बॉलिवूडमधील प्रवास आणि संघर्षांबद्दल बोलली. दरम्यान, महिला केंद्रित चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे याचा तिच्यावर आणि तिच्या फिल्मी करियरवर खूप वाईट परिणाम होत असल्याचे कंगनाने सांगितले.
मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका चोप्रा म्हणाली, “ज्यावेळी आम्ही महिला-केंद्रित चित्रपट करतो, तेव्हा अभिनेत्रींवर खूप दबाव असतो. आपण अनेक महिलांवर आधारित चित्रपट यशस्वी होताना पाहतो, पण एखादा चित्रपट यशस्वी होत नाही, त्यावेळी दबाव वाढतो.”
चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचे तर, सॅकल्निच्या अहवालानुसार, चित्रपटाने चार दिवसामध्ये, ४.२५ कोटी इतकी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी १.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १. ३० कोटी, तर तिसऱ्या दिवशी १. २५ कोटींची, तर चौथ्या दिवशी अर्थात सोमवारी फक्त ५० लाखांची कमाई केली आहे. (Bollywood Film)
कंगनाचा हा चित्रपट तब्बल ४५ कोटी खर्चून तयार केला आहे. इतक्या धिम्या गतीने चित्रपट कमाई करत असून निर्मात्यांनी केलेला खर्चही वसूल करणे कठीण जाईल, असं चित्र निर्माण झालं आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.