Prajakta Mali Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: "ही हॉलिवूड ॲक्ट्रेस कोण?" मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहत्याची मजेशीर कमेंट

Filmfare Marathi 2024 Awards: नुकतंच 'फिल्मफेयर मराठी २०२४' पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी प्राजक्ताने हटके वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Chetan Bodke

Prajakta Mali Look

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या (maharashtrachi hasya jatra) माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळालेली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या प्राजक्ताच्या फॅशनची नेहमीच चर्चा होते.

नुकतंच 'फिल्मफेयर मराठी २०२४' पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. पुरस्कार सोहळ्यामध्ये, प्राजक्ताने हटके वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत सगळ्यांचेच लक्ष वेधले. तिची हटके फॅशन पाहून चाहत्यांनी तिला थेट हॉलिवूड अभिनेत्रीचीच उपमा दिलेली आहे.

प्राजक्ता माळी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांसोबत स्टायलिश अंदाजामध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत 'फिल्मफेयर मराठी २०२४' पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने, मेटालिक हाय स्लिट ड्रेस परिधान करत बोल्ड लूक केला होता. केस मोकळे सोडून तिने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात स्टायलिश फोटोशूट केले. यावेळी पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने डान्सही केला. तिच्या ह्या मॉर्डन आणि हॉट लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. (Fashion)

अभिनेत्रीच्या ह्या मॉडर्न लूकवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून फॅशनची जोरदार चर्चा होत आहे. ४३ हजारांहून अधिक चाहत्यांनी व्हिडीओवर लाईक्स केले आहेत. तर, अनेक युजर्सने व्हिडीओला कमेंट केली आहे. "ही हॉलिवूडची ॲक्ट्रेस कोण आहे ?", "तरीच म्हटलं इतकं तापमान का वाढलंय", "खूपच सुंदर प्राजक्ता" सह अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांनी केलेल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि क्रांती रेडकरनेही प्राजक्ताच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. "केस छान दिसत आहेत", असं दोघींनी म्हटलं आहे. (Social Media)

सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचं सूत्रसंचालन करत आहे. तर आपल्या फॅशन आणि अभिनयाच्या माध्यमातून ती कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. तिच्या अनेक भूमिकेंच चाहत्यांकडून कौतुक केले जाते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT