Prajakta Mali Phulwanti Movie Released Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Phulwanti Movie : 'फुलवंती' कधी येणार?, प्राजक्ता माळीने वाढदिवशी केली मोठी घोषणा

Prajakta Mali Phulwanti Movie Released Date : प्राजक्ता माळीचा आज (८ ऑगस्ट) वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी तिने या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली आहे प्राजक्ताचा आज ३५ वा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्राजक्ता माळीचा आज (८ ऑगस्ट) वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी तिने या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली आहे प्राजक्ताचा आज ३५ वा वाढदिवस आहे. 'फुलवंती' चित्रपटाची निर्मिती स्वत: प्राजक्ताने केली असून या चित्रपटामध्ये ती प्रमुख भूमिकेतही दिसणार आहे. अभिनेत्रीने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे.

'फुलवंती' चित्रपटामध्ये 'फुलवंती'च्या भूमिकेत प्राजक्ता दिसणार आहे. निर्माती प्राजक्ता माळीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे करणार आहे. स्नेहल तरडे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून 'फुलवंती' चित्रपटाच्या माध्यमातून ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर निर्माती म्हणून प्राजक्ताचा सुद्धा हा पहिलाच चित्रपट आहे.

अवघ्या काही तासांपूर्वीच प्राजक्ताच्या ह्या बहुचर्चित चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये, एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली 'फुलवंती' दिमाखत बसलेली दिसत आहे. या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल. पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षक बांधू शकतात. मुळात पहिली झलक पाहूनच 'फुलवंती'ची भव्यता कळतेय. रसिक प्रेक्षकांसाठी सांगीतिक नजराणा असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल. "पद्मविभूषण स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे" यांच्या 'फुलवंती' कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.

चित्रपटाबद्दल निर्मात्या प्राजक्ता माळीने सांगितले की, "गेल्या अनेक दिवसांपासून मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज तो दिवस उजाडला आहे. मी माझ्या वाढदिवशी माझ्या चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ शकले, याबद्दल मी देवाचे आभार मानते. 'फुलवंती' चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की 'फुलवंती'च का? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले; साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी 'फुलवंती' एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या 'फुलवंती' या कादंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती."

"मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य 'फुलवंती' तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. 'फुलवंती'मध्ये साथ लाभलेल्या पॅनोरमा स्टुडिओजच्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. 'फुलवंती' आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल."

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार ॲन्ड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रॉडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी, सहनिर्माते आहेत तर विक्रम धाकतोडे सहाय्यक निर्माते आहेत या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. संगीताची जबाबदारी अविनाश - विश्वजीत यांनी सांभाळली आहे. 'फुलवंती'च्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली असून; वितरणाची धुराही पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT