Phullwanti Motion Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Phullwanti : प्राजक्ता माळीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, 'फुलवंती'चा मोशन पोस्टर रिलीज

Phullwanti Motion Poster : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

मालिका आणि चित्रपटांतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. उत्कृष्ट अभिनेत्री, होस्ट आणि बिझनेस वुमन अशा वेगवेगळ्या माध्यमांतून तिने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता माळी आता नव्या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तिने तिच्या पहिल्या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

'फुलवंती' असं प्राजक्ताच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल प्रवीण तरडेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्नेहल एक उत्तम अभिनेत्री असून या चित्रपटातून ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतेय. पनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज होणार आहे. मोशन पोस्टरबद्दल सांगायचे तर, चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर ढोलकी दिसत असून तिच्यावर घुंगरू आणि फुलं पडत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या ह्या मोशन पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे तर, मराठी साहित्यिक आणि नाटककार बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'फुलवंती' या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. २०२१ मध्ये प्राजक्ताने या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही इन्स्टाग्रामवर सांगितले होते. या चित्रपटामध्ये कोणकोणती स्टारकास्ट दिसणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanush: 'रांझणा'चा क्लायमॅक्स एआयने बदलल्यामुळे सुपरस्टार धनुषने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, हा तो चित्रपट...

Maharashtra Live News Update : एक मंडळ एक ढोल पथक करा, गणेश मंडळांची पोलिसांना विनंती

Dadar Kabutar Khana: दादरमध्ये कबुतर खाना कुठे आहे?

Nashik Crime : दारु पिण्यास मागितले पैसे; कुटुंबीयांनी नकार दिल्याने राग अनावर, पेट्रोल टाकून राहते घरच पेटविले

Pune Accident: रक्षाबंधनाआधीच बहीण-भावाची ताटातूट, अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू, बहिणीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT