Poonam Pandey SAAM TV
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: दुसऱ्या लग्नाच्या चर्चांवर पून पांडेने सोडलं मौन, म्हणाली, लग्न करणे ही...

Poonam Pandey Talks On Marriage : पूनम पांडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात पूनमने तिच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केले आहे.

Shreya Maskar

अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिच्या विविध लूक्सचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा बेधडक अंदाजने ती कार्यमच चर्चेत राहते. असाच एका बेधडक अंदाजातील वक्तव्याचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पूनम पांडे नुकतीच एका कार्यक्रमात स्पॉट झाली. तेव्हा तिला तिच्या लग्नावर प्रश्न करण्यात आला. तिने दिलेल्या उत्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. दुसऱ्या लग्नावर विचारल्यावर पूनमने खूप हटके अंदाजात उत्तर दिलं. ती म्हणाली की, "लग्न करणे ही आनंदाची बातमी कशी? लग्न झाल्यावर किती लोक सुखी असतात. आपण रोज एकतरी घटस्फोटाची बातमी ऐकतो."

याच व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पूनम पांडेला मुनव्वर फारुकीबद्दल विचारल. त्यावर पूनम बोली की, "नो कमेंट्स" असे म्हणून ती तिथून निघून गेली. पूनम पांडे आणि मुनव्वर फारुकी मित्र आहेत.

अभिनेत्री पूनम पांडेने मध्यंतरी मृत्यूची खोटी अफवा पसरवली होती. तिने इन्स्टाग्राम खोटी पोस्ट करून त्यात तिला सर्व्हायकल कॅन्सर झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. मात्र कालांतराने तिने अजून एक पोस्ट शेअर करून मी जिवंत आहे असे सांगत सर्व्हायकल कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी ही अफवा पसरवल्याचे सांगितले.

पूनम पांडेने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सॅम बॉम्बेशी 2020 मध्ये लग्न केले. मात्र कालांतरावर तिने त्याच्यावर मारहाणीचे आरोप केले आणि दोघेही विभक्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

Bigg Boss Marathi 6 : खानदेशच्या किंगची बिग बॉसच्या घरातून Exit, सचिन कुमावतच्या शॉकिंग एलिमिनेशनमुळे चाहते नाराज

SCROLL FOR NEXT