Pooja- Siddhesh Sangeet Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja- Siddhesh Sangeet Event: पूजा- सिद्धेशच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात; कपलने संगीत कार्यक्रमामध्ये धरला बॉलिवूड गाण्यावर ठेका

Pooja- Siddhesh Wedding Update: पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. नुकतंच या कपलचा संगीत सोहळा पार पडला.

Chetan Bodke

Pooja- Siddhesh Sangeet

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. आता साखरपुड्यानंतर हे कपल लग्नासाठी तयार झाले आहेत. लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. नुकतंच या कपलचा संगीत सोहळा पार पडला. यावेळी दोघांच्याही जवळचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी संगीत सोहळ्याला पुजाने आणि सिद्धेशने एकत्र डान्सही केला होता. दोघांनीही यावेळी ‘साडी का फॉल सा’ गाण्यावर जबरदस्त ठेका धरला होता. दोघांच्याही हूक स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी सिद्धेशने ब्लॅक कलरचा कोट, पँट आणि व्हाईट शर्ट वेअर करत संगीत कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तर पूजानेही ब्लॅक कलरचा लाँग फुल्ल वेस्टर्न आऊटफिटने सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या सोशल मीडियावर पूजा आणि सिद्धेशच्या संगीत कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.

पूजा- सिद्धेशच्या संगीत सोहळ्याला दिग्दर्शक पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, अभिजित खांडेकर, सुखदा खांडेकर, आदिनाथ कोठारे, भार्गवी चिरमुले, मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, अमृता खानविलकरसह अनेक सेलिब्रिटींनी यावेळी संगीतला उपस्थिती लावली होती. संगीत सोहळ्यामध्ये, पूजाची बहिण रुचिरा आणि भाऊ श्रेयसने डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधले. रुचिराने ‘रुपेरी वाळूत’ गाण्यावर जबरदस्त ठेका धरताना दिसली तर, भाऊ श्रेयसने आणि त्याच्या भावांनी ‘गोड गोजिरी’ गाण्यावर मिश्किल डान्स स्टेप करत सर्वांचे मनोरंजन केले. यावेळी पूजाच्या फॅमिलीमधल्या सदस्यांनीही डान्स केला.

या कपलच्या संगीत सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पूजा व सिद्धेश आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या कपलच्या लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झालेली आहे. २८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने त्याचं नाव सांगत त्याची चाहत्यांसोबत ओळखही करुन दिली. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT