Girish Karnad On Neena Gupta Instagram @neena_gupta
मनोरंजन बातम्या

Girish Karnad On Neena Gupta: ‘तू कधीच हिरोईन होणार नाहीस’, दिग्गज अभिनेत्याने नीना गुप्ता यांना स्पष्ट सांगितलं होतं

Neena Gupta Interview: वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

Chetan Bodke

Girish Karnad On Neena Gupta

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या खास शैलीतल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आल्या आहेत. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साथ साथ’ चित्रपटानंतर नीना यांना कोणत्या भूमिका मिळायच्या, याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकताच ‘शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये नीना गुप्ता यांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेते गिरीश कर्नाड यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे.

मुलाखतीत नीना गुप्ता यांनी सांगितले, “१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साथ साथ’मध्ये मी एका मुर्ख आणि विनोदी मुलीचे पात्र साकरले होते. माझं ते पात्र नकारात्मक होते. चित्रपटात साकारलेली भूमिका आणि चित्रपट आजही सर्वांच्या लक्षात आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान, अभिनेते गिरिश कर्नाड भेटले होते. त्यांनी माझा तो चित्रपट पाहून मला एक प्रतिक्रिया दिली होती.”

“तो चित्रपट पाहून मला प्रमुख भूमिका किंवा हिरोईनची भूमिका मिळणं बंद होईल. ज्यावेळी तुम्ही विनोदी भूमिका साकारतात तेव्हा तिथेच तुमच्या फिल्मी करियरला ब्रेक लागतो, असं मत गिरीश कर्नाड यांचं होतं. त्यांचं मत खरोखरंच योग्य होतं. त्या चित्रपटानंतर मला सर्वच तशाच भूमिका ऑफर करू लागले. मला मार्गदर्शक म्हणून कोणीही नव्हते. ज्यावेळी मी एनएसडीमधून शिक्षण घेऊन बाहेर आली, त्यानंतर माझ्या मनामध्ये मुंबईत लगेचच काम मिळेल एक अशी समज होती. पण ही समज नंतर सपशेल चुकीची ठरली. हा एक व्यवसाय आहे. या व्यवसायाबद्दल मला फारशी माहिती नसल्यामुळे मी भरपूर चुका केल्या होत्या.” असं मुलाखतीमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या. (Entertainment News)

गिरीश कर्नाड हे बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचे २०१९ मध्ये निधन झाले. त्यांनी अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्येही काम केले. नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, त्यांना ‘पंचायत’ वेबसीरीज मुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यासोबतच ‘लस्ट स्टोरीज २’, ‘गुड बाय’, ‘उंचाई’, ‘बधाई हो’सह अनेक कलाकृतींमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT