Nana Patekar On MeToo Allegations Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar Interview : तनुश्री दत्ताने केलेल्या MeToo च्या आरोपांवर नाना पाटेकरांनी मौन सोडलं, आरोपांवर पहिल्यांदाच केलं भाष्य

Chetan Bodke

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने (Tanushree Dutta) २०१८ मध्ये MeToo दरम्यान नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. मीडिया रिपोर्टनुसार, तनुश्रीने २००८ मध्ये रिलीज झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील गाण्याच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर नाना यांनी सहा वर्षांनी उत्तर दिलं आहे.

नाना पाटेकर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेहमीच त्यांच्या हिट चित्रपटांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते. सिनेसृष्टीतील करिअरबरोबरच नाना त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आले. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर नाना पाटेकर यांनी 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्तर दिले आहे. ते म्हणाले, "नाही. मला केव्हाच राग आला नाही. कारण मला माहित होते की माझ्यावर होत असलेले आरोप सर्व खोटे आहेत. जर कोण खोटं बोलत असेल तर मी त्यावर राग व्यक्त का करू ? सर्व आरोप खोटे असल्यामुळे मी शांत बसलो होतो. "

मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी पुढे सांगितले, " मला माझ्यातील सत्य माहित आहे आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अचानक कोणीतरी येऊन म्हणतं की तुम्ही असं केलं आहे, तुम्ही तसं केलं आहे. मी माझं सत्य कोणाला सांगायला का जाऊ? कोण काय म्हणतंय याने मला काही फरक पडत नाही. माझ्याकडून या प्रकरणी काय उत्तर अपेक्षित आहे? मी काहीच केलं नाहीये, हे मला माहित असताना मी काहीच केलं नाही, असं बोलणं अपेक्षित होतं का?"

सोशल मीडियाविषयी नाना पाटेकर म्हणाले, "असं काही घडलं नसताना आपण याबद्दल का बोलत आहोत. मला जुन्या गोष्टी विसरायच्या आहेत. मी कोणाशीही गैरवर्तन केले नाही हे मला माहीत आहे. मी सोशल मीडियावरील गोष्टींकडे लक्ष देत नाही. कोण काय लिहित आहे किंवा काय बोलत आहे, या गोष्टींवर मी नियंत्रण ठेवू शकत नाही. मी कोणाचे तोंड कसे बंद करू शकतो, म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला तुमची सत्यता जाणून घेणे आवश्यक आहे, ते पुरेसे आहे. बाकी लोकांचं काम म्हणायचं, ते नक्कीच काहीतरी बोलतील."

तनुश्री दत्तने २०१८ मध्ये Me Too मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे बराच गोंधळ माजला होता. पण त्यावेळी नाना पाटेकर यांनी या आरोपांवर भाष्य करणं टाळलं होतं. तब्बल ६ वर्षानंतर पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी त्या आरोपांवर भाष्य केले आहे. तनुश्रीने नानांबरोबरच विवेक अग्निहोत्री आणि गणेश आचार्य यांच्यावरही आरोप केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT