Mahak Chaudhary News  Saam TV
मनोरंजन बातम्या

Mahak Chaudhary News : मूळची यूपीची, टॉलिवूड अन् बॉलिवूड आजमावले, आता ग्लॅमरस अभिनेत्री महाराष्ट्राच्या राजकारणात उतरली

Mahak Chaudhary Joins Rashtriya Samaj Paksha : महक चौधरी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. महक यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात एन्ट्री घेतली आहे.

Ruchika Jadhav

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने सामने उभे आहेत. तर दुसरीकडे मनोरंजन विश्वातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ऐन निवडणूकीच्या तोंडावर सिनेविश्वातील कलाकार राजकारणात एन्ट्री घेत आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री घेतल्यावर आता महादेव जानकर यांच्या पक्षात देखील एका नव्या अभिनेत्रीने एन्ट्री घेतली आहे.

महक चौधरी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. महक यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात एन्ट्री घेतली आहे. नुकताच अभिनेत्रीचा जाहीर पक्ष प्रवेश पार पडला. महक रासपच्या मुंबई अध्यक्षा म्हणून कामे पाहणार आहेत, अशी माहिती मिळालीये.

महक चौधरी निवडणूक लढणार

पक्ष प्रवेश झाल्यानंतर आता महक चौधरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरणार अशी चर्चा आहे. महक यांनी स्वत: या बद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिलेत. आगामी निवडणुकीत महक वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

गीता कुमारी सिंह उर्फ महक चौधरी मला सांगायला आनंद होत आहे की, राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वर्सोवा मतदार संघातून मला पक्षाकडून तिकीट देण्यात आलं आहे. आजपर्यंत तुम्ही मला नेहमीच पाठिंबा दिला, यापुढेही असाच पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा करते, असं महक चौधरीने यात म्हटलं आहे.

कोण आहेत महक चौधरी?

अभिनेत्री महक चौधरी मूळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत. त्यांनी साऊथ इंडस्ट्रीतून फिल्मी करिअरची सुरुवात केली. २०१५ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. साऊथमध्ये काम केल्यानंतर महक यांनी बॉलिवूडमध्येही काम केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT