लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या अभिनयामुळे आणि सोशल मिडियावरील रिल्समुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी मानसी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मानसीचा गेल्या वर्षी बॉक्सर प्रदीप खरेरासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अभिनेत्रीच्या पुर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा उरकला आहे. प्रदीपने विशाखा जाटनीसोबत साखरपुडा आटोपला आहे. सोशल मीडियावर रिल शेअर करत त्याने साखरपुड्याची माहिती दिली. पुर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केल्यानंतर मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रेमाबद्दल महत्वाचा सल्ला दिला आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय की, "एखाद्या सशक्त व्यक्तीला सध्याच्या जगात अविवाहित राहणे आवश्यक आहे. तु्म्ही कायमच तुमच्या प्रार्थना, सकारात्मकतेकडे आणि संयमाकडे विशेष लक्ष द्या. कोणासाठी तरी एकटं राहा. अविवाहित राहण्यापेक्षा तुमच्या आयुष्याची प्रशंसा करा. स्वत:वर प्रेम करा,आयुष्यात मिळणाऱ्या प्रेमासाठी प्रार्थना करा, प्रेमाची इच्छा करा, प्रेमाची स्वप्ने पहा... परंतु प्रेमाची वाट पाहत आपले जीवन थांबवू नका. चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा अविवाहित राहणं नक्कीच चांगले आहे."
"या वर्षी मी हरले, जिंकले, अयशस्वी झाले, रडले, हसले, प्रेम केले, पण मी मोडले नाही. सशक्त महिला कधीही हार मानत नाहीत. एक दिवस अपयश येते, पण नेहमी नेहमी अपयश येतं असं नाही. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीर राहिलं पाहिजेल. मी परत येऊ माझ्या कामामध्ये यश कसं मिळेल यासाठी प्रयत्नन करेन. मी माझ्या दु:ख आणि वेदना सोडून दिल्या आहेत, मी कधीही मागे वळून पाहत नाही, कधीही हार मानणार नाही… त्यामुळे नेहमीच सकारात्मक राहा आणि आयुष्याच्या वाटेमध्ये सकारात्मक विचार करा. चीयर्स, टू बीइंग मी..." अशी पोस्ट मानसीने शेअर केलेली आहे.
विशाखाने इन्स्टा रीलमध्ये साखरपुड्यातील खास सोहळ्यातील काही क्षण शेअर केले आहेत. प्रदीप पेशाने सोशल मिडिया इन्फ्लूएंसर आणि मॉडेल आहे त्यासोबतच तो नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. तर जान्हवी सोशल मिडिया इन्फ्लूएंसर आहे. प्रदीप आणि मानसीचा गेल्या वर्षी अधिकृत रित्या घटस्फोट झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.