Madhuri Pawar Share Memory With His Mom-Dad  Facebook Madhuri Pawar
मनोरंजन बातम्या

Madhuri Pawar Share Post : दारूच्या नशेत वडिलांनी आईला मारण्यासाठी... मराठी अभिनेत्रीने सांगितली ती आठवण

Marathi Actress : माधुरीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Marathi Actress Madhuri Pawar Get Emotional : अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारला महाराष्ट्राच्या घराघरात ओळखले जाते. साताऱ्याच्या माधुरीने तिच्या जीवनात खूप गरिबी पहिली आहे. मालकी आणि सीरीजमुळे आज माधुरी लोकप्रिय झाली आहे. मालिकांसह तिने चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. खूप संघर्ष करून माधुरी इथपर्यंत पोहोचली आहे.

काही दिवसांपूर्वी माधुरीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीची तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा संघर्ष सांगताना दिसत आहे. तिने 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीतील हा व्हिडिओ आहे. (Latest Entertainment News)

लहानपणी माधुरीचे कुटुंब पाल बांधून राहायचे. माधुरी देखील झोपडटपट्टीत पत्राच्या घरामध्ये राहायची आणि घराच्या छतावर राहून अभ्यास करायची. खूप अडचणी आणि संघर्ष केल्यानंतर आलेलेया या सुगीच्या दिवासांमुळे माधुरीच्या आईला तिचे खूप कौतुक आहे.

माधुरी पवारने या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर देत अनेक उलघडे केले. दरम्यान माधुरीने एक घटना देखील शेअर केली. माधुरीने सांगितले की, एकदा आई-बाबांचं भांडण सुरू होतं. आता वडील दारू पित नाही, पण त्यावेळी प्यायचे, त्यामुळे त्यांचं मानसिक संतूलन ठिक नव्हतं.

दारूच्या नशेत त्यांनी आईला मारण्यासाठी हात उचलला आणि मी मध्ये आले, त्यामुळे मला लागलं. तेव्हा पहिल्यांदा दुर्दैवाने मी मार खाल्ला होता. त्यानंतर बाबांना खूप वाईट वाटलं होतं. त्यांनी स्वतःच्या हाताला इजा करून घेतली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मारलं नाही. त्या एका घटनेशिवाय मला लहानपणापासून कधीच मार पडला नाही.”

माधुरीने रानबाजार या वेबसीरीजमध्ये काम केले आहे.तसेच तुझ्यात जीव रंगला, देव माणूस या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. (Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT