Panchak Movie Poster Released Instagram/ @madhuridixitnene
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit Latest Movie: माधुरी दीक्षितचे निर्मिती क्षेत्रात पाऊल, नव्या चित्रपटाचा पोस्टर रिलीज

Panchak Movie Poster Out: ‘पंचक’चा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. घरात पंचक लागल्यामुळे ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली होती. टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Chetan Bodke

Panchak Movie Poster Released

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित कायमच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनय, नृत्य आणि आता निर्मिती क्षेत्रातही माधुरीने पाऊल ठेवले आहे. ‘पंचक’ चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’चा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. घरात पंचक लागल्यामुळे 'आता कोणाचा नंबर' या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली होती. टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Marathi Film)

रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये, 'आता कोणाचा नंबर?' हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पोस्टरमध्ये प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत असतानाच आदिनाथ कोठारे मात्र दोन्ही हात कानावर ठेवून ही सर्कस थांबवू पाहतोय. त्यामुळे आता आदिनाथच्या ऑपेरापुढे ही सर्कस नमते घेणार का? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Latest News)

डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' मधील हे कोडे येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारीला सुटणार आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक जयंत जठार, राहुल आवटे यांनी सांगितले की, “हा चित्रपट म्हणजे सिच्युएशनल आणि ब्लॅक कॉमेडी आहे. आपल्या आजूबाजूचा विषय, ज्याचे गांभीर्य जाऊ न देता अतिशय मजेशीर पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा आहे., टिझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी टीझरबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्याच कलाकारांचा अभिनय अतिशय दर्जेदार आहे. त्यांच्या अभिनयाने यात अधिक रंगत आणली आहे. खोतांच्या घरात लागलेल्या या पंचकात आता कोणाचा नंबर लागणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

SCROLL FOR NEXT