Merry Christmas 2nd Day Box Office Collection Instagram @Katrinakaif
मनोरंजन बातम्या

Merry Christmas 2nd Day Collection: कतरिना आणि विजयच्या 'मेरी ख्रिसमस'ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई; दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Chetan Bodke

Merry Christmas 2nd Day Box Office Collection

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) चित्रपट 12 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

श्री राम राघवन दिग्दर्शित सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. फक्त चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडून आणि बऱ्याच चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे.

चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला होत असला तरी, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची संथ गतीनं कमाई सुरुवात झाली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल... (Merry Christmas Film 2nd Day Box Office Collection)

सॅकल्निकच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी २.५५ कोटींची कमाई केली होती. तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३. ५० कोटींचा आकडा गाठला आहे. चित्रपटाने दोन दिवसात एकूण ६. ५ कोटींची कमाई केली आहे. संथगतीने या चित्रपटाने जरीही कमाई सुरु केली असली तरी, या चित्रपटाची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि विजय सेथुपती यांच्यासोबतच राधिका आपटे, आदिती गावेकर, टिनू आनंद, संजय कपूर आणि विनय पाठक हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात राधिकाचा कॅमिओ पाहायला मिळणार आहे. 'मेरी ख्रिसमस'या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कतरिना- विजयची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT