Sharad Pawar Watch Satyashodhak Movie: शरद पवार यांनी सपत्नीक पाहिला ‘सत्यशोधक’ चित्रपट; सरकारकडे केली मोठी मागणी

Satyashodhak Movie: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सत्यशोधक’ चित्रपट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार यांनी सरकारकडे एक विशेष मागणीही केली.
Sharad Pawar Watch Satyashodhak Movie
Sharad Pawar Watch Satyashodhak MovieFacebook
Published On

Sharad Pawar Watch Satyashodhak Movie

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ (Satyashodhak Movie) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच हा चित्रपट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सपत्नीक ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार यांनी चित्रपटाचे कौतुक केले असून शिवाय त्यांनी सरकारकडे एक विशेष मागणीही केली. (Marathi Film)

Sharad Pawar Watch Satyashodhak Movie
TRP Rating Of Marathi Serial: टीआरपीच्या शर्यतीतून अरुंधतीची 'आई कुठे काय...' मालिका गायब, ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ चुरशीची लढत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सपत्नीक 'सत्यशोधक' चित्रपट पाहिला आहे. शरद पवार यांना 'सत्यशोधक' चित्रपट आवडला असून यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना 'सत्यशोधक' चित्रपट दाखवण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी शरद पवार यांना फुले पगडी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. यादरम्यानचे फोटो 'सत्यशोधक' चित्रपटाच्या अधिकृत फेसबूक पेजवर शेअर करण्यात आले. (Marathi News)

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. 'सत्यशोधक' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. नुकतंच झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे. (Sharad Pawar)

Sharad Pawar Watch Satyashodhak Movie
Actress Radhika Apte: विमानतळावर अडकली अभिनेत्री राधिका आपटे, पोस्ट शेअर करत म्हणाली 'ना वॉशरुम, ना पाण्याची सोय…,'

दरम्यान, समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित 'सत्यशोधक' चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत. 'सत्यशोधक' या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे या सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. (Entertainment News)

Sharad Pawar Watch Satyashodhak Movie
Sridevi Prasanna Trailer: एकमेकांच्या वेगळेपणात आपलेपणा सापडणार ?; सई - सिद्धार्थच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धम्माल ट्रेलर रिलीज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com