Janhvi Kapoor Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Trolled : महापुरुषांवर भाष्य करणं जान्हवी कपूरला पडलं महागात; नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

Janhvi Kapoor Interview : अभिनेत्री जान्हवी कपूरने मुलाखतीदरम्यान तिने महापुरुष यांच्याविषयी भाष्य केले आहे. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या जान्हवी प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच जान्हवीने लल्लनटॉप वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाष्य केले. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर म्हणाली, "गांधी-आंबेडकर मुद्द्यावर होणारा वाद माझ्यासाठी उत्सुकतेचा विषय आहे. गांधी आणि आंबेडकरांचे एका विशिष्ट विषयावरून कसे विचार बदलले, त्यांना एकमेकांप्रती काय वाटायचे, दोघांनीही एकमेकांची कशी मदत केली, हे पाहणं मला आवडेल. दोघांनीही समाजाला खूप मदत केलेली आहे."

जान्हवी मुलाखतीत पुढे म्हणाली, "बाबासाहेब नेहमीच आपल्या विचारांवर ठाम राहिलेले आहेत. पण मला वाटतं महात्मा गांधी यांनी आपले विचार परिस्थितीनुसार बदलले आहे. कारण आपल्या देशात जो जातीयवाद आहे, त्यावर काहींचे दृष्टिकोन आणि त्याचे विचार यात बराच फरक आहे."

सध्या अभिनेत्रीची ही मुलाखत सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. जान्हवीच्या ह्या विधानामुळे नेटकरी तिला तुफान ट्रोल करीत आहे. 'तु तुझा विचार तुझ्या जवळंच ठेव, सर्वात आधी दोन्हीही व्यक्तींचा व्यवस्थित अभ्यास कर', अशी तिखट प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.

'तु फक्त अभिनयच कर, उगाच राजकारणात एन्ट्री करण्याचा विचार करू नको' अशा अनेक कमेंट्स अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. जानवीच्या या वक्तव्याचं काही व्यक्तींनी समर्थनही केलं आहे. तिने मांडलेल्या विचारांचं कौतुक काहीजण कौतुक करीत आहेत. पण यामुळे तिला चांगलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT