Janhvi Kapoor At Venkateswara Swami Temple Instagram
मनोरंजन बातम्या

Janhavi Kapoor And Shikhar Pahariya: जान्हवी कपूरने प्रियकरासोबत घेतलं श्री व्यंकटेश्वर स्वामीचं दर्शन; फोटो शेअर करत म्हणाली...

Janhavi Kapoor And Shikhar Pahariya Photos: अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात नतमस्तक होत, नव्या वर्षाची सुरुवात अगदी जोमाने केलेली दिसत आहे.

Chetan Bodke

Janhvi Kapoor At Venkateswara Swami Temple

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. कायमच आपल्या स्टायलिश लूकसाठी चर्चेत राहणारी जान्हवी सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे बरीच चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने आंध्र प्रदेशमधील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात नतमस्तक होत, नव्या वर्षाची सुरुवात अगदी जोमाने केलेली दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत शिखर पहाडियासुद्धा होता. (Bollywood)

‘एएनआय’ वृत्तसंस्थेने जान्हवीचा आणि शिखरचा दर्शनाला जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवीने सोनेरी रंगाची साडी तर शिखरने पांढऱ्या रंगाची लुंगी परिधान केली आहे. दोघांचाही हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आंध्र प्रदेशमधील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी काही फोटोही शेअर केले होते. (Bollywood News)

जान्हवीने शुक्रवारी सोशल मीडियावर पांढऱ्या साडीतील फोटो पोस्ट केलेत. साऊथ इंडियन लूक परिधान करत अभिनेत्रीने तेथील अनेक फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना 'आता खऱ्या अर्थाने २०२४ची सुरुवात झाल्यासारखं वाटतंय.' असं कॅप्शन दिलं आहे.

नुकतंच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी कपूरसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’च्या नुकत्याच नव्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने त्याच्यासोबतच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चाहत्यांना हिंट दिली आहे.

तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे. शिखर पहाडिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. दरम्यान, यापूर्वी शिखर- जान्हवी एकत्र उज्जैनच्या महाकालच्या दर्शनाला एकत्र गेले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT