Kiran Mane Post On Janhvi Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post : 'मराठी कलाकारांच्या सणसणीत मुस्काडात...', गांधी-आंबेडकर मुद्द्यावरील जान्हवीच्या 'त्या' विधानावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post On Janhvi Kapoor : 'बिग बॉस मराठी ४' फेम किरण माने जान्हवी कपूरचं कौतुक करत त्यांनी मराठी सिनेसृष्टीतून अभिनेत्री आणि अभिनेत्यांना टोला लगावला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या जान्हवी प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच जान्हवीने लल्लनटॉप वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाष्य केले. अशातच 'बिग बॉस मराठी ४' फेम किरण माने यांनी तिचं कौतुक करत त्यांनी मराठी सिनेसृष्टीतून अभिनेत्री आणि अभिनेत्यांना टोला लगावला आहे.

किरण माने यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर जान्हवीचा मुलाखतीचा काही भाग शेअर केलेला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय ! माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी... एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये 'गांधी-आंबेडकर' यांच्याविषयी बोलताना खुप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय... अनुभवलाय... त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हॉटस् ॲपवर फॉर्वर्ड केलेल्या उकीरड्यातल्या कचर्‍याला आणि प्रोपोगंडा सिनेमांच्या गटारघाणीला 'इतिहास' मानणार्‍या बहुतांश मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या सणसणीत मुस्काडात आहे ही ! हे ज्ञान खुप पुस्तकं वाचण्यानं आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरानंच येतं. सलाम जान्हवी... खुप खुप प्रेम"

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर म्हणाली, "गांधी-आंबेडकर मुद्द्यावर होणारा वाद माझ्यासाठी उत्सुकतेचा विषय आहे. गांधी आणि आंबेडकरांचे एका विशिष्ट विषयावरून कसे विचार बदलले, त्यांना एकमेकांप्रती काय वाटायचे, दोघांनीही एकमेकांची कशी मदत केली, हे पाहणं मला आवडेल. दोघांनीही समाजाला खूप मदत केलेली आहे. बाबासाहेब नेहमीच आपल्या विचारांवर ठाम राहिलेले आहेत. पण मला वाटतं महात्मा गांधी यांनी आपले विचार परिस्थितीनुसार बदलले आहे. कारण आपल्या देशात जो जातीयवाद आहे, त्यावर काहींचे दृष्टिकोन आणि त्याचे विचार यात बराच फरक आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT