Isha Keskar On Live In Relationship Instagram
मनोरंजन बातम्या

Isha Keskar On Live In Relationship: 'मला कुणाचीही पर्वा नाही, लिव्ह इनमध्ये राहायचंच होतं'; लग्नाबाबतही ईशा केसकरचं मोठं भाष्य

Isha Keskar And Rishi Saxena Relation News: प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न याबाबत अभिनेत्री इशा केसकरने मोठा खुलासा केला आहे.

Chetan Bodke

Isha Keskar On Live In Relationship:

टेलिव्हिजन अभिनेत्री ईशा केसकर अनेक मालिकेच्या माध्यमातून तिला प्रसिद्धी मिळाली आहे. ‘जय मल्हार’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री ईशा केसकर अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ईशा केसकर आणि ऋषी सेक्सेना हे दोघेही रिलेशनमध्ये राहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. नुकताच एका पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

ईशाने नुकतंच एका पॉडकास्ट चॅनलला मुलाखत दिली आहे. मुलाखतीत अभिनेत्रीने लिव्ह इन रिलेशनशिप विषयी भाष्य केलं आहे. अभिनेत्री मुलाखतीत म्हणते, “मी कॉलेजमध्ये शिकत असताना, लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल ऐकलं होतं. सर्व ऐकलेल्या गोष्टी मी आता ट्राय करण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मनात अनेक दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार होता. लोकं काय विचार करतील?, स्वत:चे आई- बाबा काय म्हणतील? या गोष्टीचा ही मी विचार केला नव्हता. आयुष्यात घेतलेल्या सर्व निर्णयांसाठी मीच जबाबदार आहे. मला जे योग्य निर्णय वाटतात , ते निर्णय मी घेते.”

मुलाखतीत ईशा केसकर पुढे म्हणाली, “लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर माझा अनुभव खूपच चांगला होता. साथीदाराला प्रत्येक गोष्टीत एकमेकांना मदत करावी लागते. घरातील अनेक गोष्टींचा निर्णय घेताना एकमेकांचे मत जाणून घेणे. माझा लिव्ह इन रिलेशनमधला एकंदरित अनुभव खूप चांगला आहे. ऋषी माझा जोडीदार नाही, तर माझा रुममेट देखील आहे. एकमेकांचा आदर करत आम्ही प्रत्येक निर्णय घेतो.”

मुलाखतीच्या शेवटच्या भागात ईशा म्हणते, “ लग्न झाल्यानंतर सगळ्यांनाच सणवार करावे लागतात. मी मालिकेत अभिनय करत असताना, हळदी-कुंकू, मंगळागौर, साडी परिधान करणं या सर्व गोष्टी केल्या आहेत. आता मी लग्न केल्यावर त्या सर्व गोष्टी मला रियल लाईफमध्ये ही कराव्या लागणार असल्यामुळे मी खरंच त्या गोष्टी पुन्हा करणार नाही. मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संपूर्णपणे खूश आहे. सोबतच माझं मालिकेत आणि चित्रपटात एकूण १३ वेळा लग्न झालं आहे. त्यामुळे मला पुन्हा थाटामाटत लग्न करण्याची इच्छा नाही.” असे ईशाने मुलाखतीत स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT