OMG 2 film gets A certificate : अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट 'ओ माय गॉड 2' त्याच्या ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी अक्षय कुमारचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोणतेही अडथळे न आणता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केला आहे. निर्मात्यांना चित्रपटामध्ये 27 बदल करावे लागणार आहेत. यासोबतच चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र म्हणजेच प्रौढ प्रमाणपत्र मिळाले आहे. १८ वर्षांखालील लोक हा चित्रपट पाहू शकणार नाहीत.
OMG 2 चं लेखन आणि दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'ओएमजी'चा हा सिक्वेल आहे. ओ माय गॉड २ मध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम धर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान या चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी रिलीज झाली आहेत.
या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली असली तरी निर्मात्यांना सुचवलेले २७ बदल कोणते आहेत ? ते पाहूया.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील बहुतांश संवाद बदलण्यास सांगितले आहे.
1. चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर बदला आणि व्हॉईस ओव्हर अॅड करा.
2. शंकराचे संपूर्ण पात्र बदला आणि अक्षय कुमारला एक भक्त आणि देवाचा दूत म्हणून दाखवा.
3. संवाद अॅड करा - नंदी माझ्या भक्ता... बोला प्रभु. नागा साधूचे न्यूड व्हिज्युअल हटवले पाहिजे.
4. मंदिराची घोषणा बदलली जावी, त्यात महिलांचा उल्लेख करण्यात आला आहे.
5. देवाची भक्ती... स्त्रिया पाहू शकत नाहीत... ओ लाल शर्ट वाले भैया... बाबांचे ध्यान करत राहा... या संवादाच बदल करा.
6. शाळेचे (सवोदय) नाव बदलण्यात यावे.
7. तिथे दारू आहे... या संवादाच्या जागी 'दारू, व्हिस्की, रम' असा उल्लेख करावा. ज्याचा उल्लेख देवाचा प्रसाद म्हणून केला गेला आहे.
8. हाईकोर्ट... मजा आएगा... बदलले पाहिजे.
9. पोस्टरमधील होर्डिंगवर मूड एक्स कंडोम काढावे.
10. बड़े बाल देखकर रुपये मिलेंगे.., हे बदलले जावे.
11. मैं टांग क्यों अड़ाऊं... हा संवाद शंकरात्या पात्राने बोलला आहे, तो बदलण्यात यावा.
12. स्त्री की योनी... हवन कुंड है। ते बदलू द्या.
13. हराम आणि पाप हे शब्द बदलले पाहिजेत. त्यांना मास्टरबेशनशी जोडण्यात आले आहे.
14. कोर्टात न्यायाधीश सेल्फी घेतात, हा सीन व्यवस्थित करायला हवा.
15. देवाचे ध्यान आणि स्नान करतानाचे दृश्य बदलले पाहिजे.
16. कांती अनैसर्गिक सेक्सचे शिल्प दाखवून सेक्स वर्करला प्रश्न विचारतो, हा सीन बदलला पाहिजे.
17. 'सत्य शिवम सुंदरम' संवादातून काढून टाकावे.
18. 'हमारा देश... पीछे नहीं है' याच सुधारणा करावी.
19. 'लिंग' हा शब्द बदलून त्याऐवजी शिवलिंग किंवा शिवाचा वापर करा.
20. वस्तुस्थिती (लैंगिक तथ्ये) संबंधित कागदोपत्री पुरावे सादर करावेत.
21. चित्रपटाची कथा काल्पनिक असल्याने, व्यक्ती, कार्यालये आणि अधिकारी यांचे सर्व दृश्य, मौखिक संदर्भ काढून टाकावेत. उदाहरणार्थ महंताचे पात्र.
22. डॉ. प्रकाश कोठारी यांचे संवाद आणि दृश्य बदलले पाहिजेत. कारण तिथे मास्टरबेशनबद्दल बोलले जात आहे.
23. देवाच्या मेसेंजरचे मद्यधुंद संवाद आणि दृश्ये बदलली पाहिजेत.
24. क्या होवे है... आप अश्लील कह रहीं... बदलले पाहिजे.
25. शिवजींचे लिंग, अश्लीलता, श्री भगवद्गीता, उपनिषद, अथर्ववेद, द्रौपदी, पांडव, कृष्ण, गोपी आणि रासलीला हे शब्द काढूण टाकावेत.
26. संवादात मिस्टर टाटा जी हा शब्द बदलला पाहिजे.
27. उंदराच्या विषाच्या बाटलीतून उंदराचे दृश्य काढले पाहिजे. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.