Saam Tv
मनोरंजन बातम्या

ananya movie review : महाराष्ट्राची क्रश असलेल्या हृता दुर्गुळेचा स्वप्नपूर्ती करायला शिकवणारा 'अनन्या' चित्रपट प्रदर्शित

रोजच्या धाकबुकीच्या जीवनामध्ये आपल्या सोबत असंख्य घटना घडत असतात. त्यातील प्रत्येक घटनेतून आपण काही ना काही शिकत असतो. अशीच एक घटना घडते अनन्या नावाच्या एका मुलीसोबत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : रोजच्या धाकबुकीच्या जीवनामध्ये आपल्या सोबत असंख्य घटना घडत असतात. त्यातील प्रत्येक घटनेतून आपण काही ना काही शिकत असतो. यातील बऱ्याच घटना चांगल्या असतात, ज्या आठवून आपल्या चेहऱ्यावर आपसूकच हसू येत तर काही अशा घटना असतात, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर फार वाईट प्रभाव पडतो. अशीच एक घटना घडते. अनन्या नावाच्या एका मुलीसोबत. त्यानंतर ती स्वतःला सावरून कशी आपली स्वप्नपूर्ती करते. यावर आधारित 'अनन्या' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'फुलपाखरू', 'मन उडू उडू झालं' या मालिकांनमधून तसेच 'दादा एक गुड न्यूज आहे' सारख्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री हृता दुर्गुलेचा शुक्रवारी २२ जुलै रोजी 'अनन्या' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित 'अनन्या' सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून योगेश सोमण, सुनील अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार या जाणत्या मंडळींबरोबरच सुव्रत जोशी, रुचा आपटे या तरुण कलाकारांनी या सिनेमामध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ऋता दुर्गुळेचा हा अभिनेत्री म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे हा सिनेमा टक्कर रणबीर कपूरच्या 'शमशेरा'शी टक्कर देणार आहे.

एखाद्या वाईट घटनेत जेव्हा आपले दोन्ही हात गमवावे लागतात तेव्हा खचून न जाता आपल्या जिद्दीने ही अनन्या आपल्या सर्व संकटांवर मात करून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेते व यशस्वी होते. गमावलेल्या हातांमुळे खचून न जाता आपल्याबाद्दलचा आत्मविश्वास पुन्हा जागा करून आपल्या स्वप्नांचा माग घेणाऱ्या अनन्याची गोष्ट या सिनेमात दाखवली आहे.

उत्तम कॅमेरावर्क, साजेसं आणि नेमकं संगीत, तेवढंच उत्तम एडिटिंग या साऱ्याच तांत्रिक बाबींनी हा सिनेमा उत्तम सजलाय, मात्र त्यात जीव ओतलाय तो कलाकारांच्या अभिनयानं. त्याचबरोबर अनन्याचे हात गायब करायची किमया या चित्रपटात व्हीएफएक्सच्या माध्यमातून अगदी उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना अजूनच आपलंस करून घेतो. सिनेमा म्हणून 'अनन्या' तुम्हाला काहीतरी छान, सकारात्मक पाहिल्याचा नक्कीच अनुभव देईल यात शंका नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT