Kanni Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Kanni Film: हृताचा 'कन्नी' FRIENDSHIPचा अर्थ समजवणार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

Kanni Poster Released: 'मन उडू उडू झालंय' मालिकेनंतर हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे दोघेही 'कन्नी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच नुकतेच चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Kanni Poster Out

'मन उडू उडू झालंय' मालिकेमध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या दोघांनीही प्रमुख भूमिका साकारली होती. आता मालिकेनंतर ही जोडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच समीर जोशी दिग्दर्शित 'कन्नी' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Marathi Film)

नुकतंच हृताने सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर सायकलवर बसलेले दिसत आहे. मात्र यात अजिंक्य राऊत मिसिंग असल्यामुळे हे पोस्टर बघून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असणार. पोस्टरमधील चौघांचेही आनंदी चेहरे त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवत आहेत. (Marathi Actors)

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांकडे झेप घेणारी ही 'कन्नी' ८ मार्चलाला प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत. (Marathi News)

हृताने 'अनन्या' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हृताने गेल्या वर्षी तिच्या वाढदिवशी अर्थात १२ सप्टेंबरला 'कन्नी' चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर जोशी यांनी संभाळली आहे.

हृता आणि अजिंक्य 'मन उडू उडू झालं' या मालिकेनंतर 'कन्नी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उंचच उंच आकाशात उडायचे असेल तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची 'कन्नी' असे म्हणत हृताने 'कन्नी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT