Hina Khan Post canva
मनोरंजन बातम्या

Hina Khan Post: महिमा चौधरीनं हिना खानला दिला धीर, कॅन्सरमधून बाहेर येण्यासाठी दिला मानसिक आधार

Hina Khan Instagram Post Viral: अभिनेत्री हिना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये हिना महिमा चौधरीसोबत एका हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने १३ सप्टेंबर रोजी तिचा ५१ वाढदिवस साजरा केला. आयुष्यातील या खास दिवशी अभिनेत्रीच्या सर्व चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे. हिना खानने महिमाच्या वाढदिवसा निमित्त एक खास पोस्ट केली होती. हिनाची ही खास पोस्ट सेशल मीडियावर व्हायरल झाली होती. हिनाच्या पोस्टमुळे महिमाने आनंदी होऊन तिच्या पोस्टला खास उत्तर दिले आहे.

हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. हिना चाहत्यांना तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या हेल्थची अपडेट देत असते. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या वाढदिवसानिमित्त हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. हिनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हिना आणि महिमा एकत्र आणि आनंदी दिसत आहेत.

फोटो शअर करताना हिनाने सांगितले की, जेव्हा ती तिच्या पहिल्या केमोथेरपी सेशनसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा तिला महिमाने आश्चर्यचकित केले. हिनाने कॅप्शन लिहिले की, "हा फोटो माझ्या पहिल्या केमोथेरपी सेशनचा आहे. त्यादिवशी मी आणि महिमा अचानक भेटलो. महिमाने माझ्यासोबत वेळ घालवला आणि माझं योग्य मार्गदर्शन केले. मला माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात मला लढण्याचा मार्ग दाखवला आहे." हिनाने पुढे सांगितले की महिना सुपर वुमन आहे. "तिने मला माझ्या आजारपणादरम्यान मला खुप मदत केली आहे त्यासोबत प्रोत्साहन देखील दिले आहे. मला कधीही असे वाटले नाही की मी या प्रवासात एकटी आहे. तू माझ्यासाठी नेहमीच खास राहशील, वाढदिवसाच्या शुभेच्छा." त्यावर महिमाने प्रतिउत्तर देत "ओह माय गॉड… धन्यवाद. तू मला खूप श्रेय दिलेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे." असे म्हटले आहे. सध्या हिना अमेरिकेत ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे.

अभिनेत्री महिमा चौधरी देखील 2022 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार घेत होती. महिमाने तिच्या जिद्दीने कॅन्सरवर मात केली होती. महिमाने एका मुलाखाती दरम्यान सांगितले की, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मी कपिल शर्मा शो बघायची महिमा लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT