Anti-TB drug
Anti-TB drugsaam tv

Anti-TB drug: आता वेगळ्या पद्धतीने होणार टीबीचे उपचार; छोटी पद्धत अधिक प्रभावी ठरण्याचा दावा

Anti-TB drug: देशात २०२५ पर्यंत टीबीचा नायनाट करण्याचं ध्येय केंद्र सरकारने ठेवलं आहे. यासंदर्भात एक पाऊल म्हणून टीबीचे नवे उपचार शोधले आहेत.
Published on

टीबीच्या रूग्णांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. आता टीबीचे उपचार नव्या पद्धतीने होणार आहेत. ही नवी पद्धत छोटी आणि जास्त प्रभावी मानली जातेय. या उपचारांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत टीबी मुळापासून नष्ट करण्याचं ध्येय ठेवलं आहे.

कशा पद्धतीने होणार उपचार?

मिळालेल्या माहितीनुसार, टीबीचे हे नवे उपचार बीपीएएलएम (BPaLM) ने केले जाणार आहेत. बीपीएएलएममध्ये चार औषधांचं कॉम्बिनेशन आहे. यामध्ये बेडाकुलाइन, प्रीटोमैनिड, लाइनजोलिड आणि मॉक्सिफ्लोक्सासिन यांचा समावेश आहे. असा दावा करण्यात येतोय की, ही औषधं अधिक सुरक्षित असून त्यांचा प्रभाव देखील यापूर्वी वापरण्यात येणाऱ्या औषधांपेक्षा जास्त असणार आहे.

एमडीआर-टीबीचे उपचार २० महिन्यांपर्यंत घ्यावे लागतात. शिवाय या औषधांमुळे गंभीर परिणाम होण्याचा धोकाही असतो. देशातून २०२५ पर्यंत टीबीचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारकडून हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Anti-TB drug
Monkeypox Virus : जीवघेण्या मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री; कोणाला धोका अधिक? पाहा व्हिडिओ

औषधांमध्ये का बदल केले गेलेत?

बेडाकुलाइन आणि लाइनजोलिड (मॉक्सिफ्लोक्सासिन सोबत किंवा त्याशिवाय ) औषधांच्या कॉम्बिनेशनमध्ये नवं एंटी-टीबी औषध प्रीटोमॅनिड याचा समावेश केला गेलाय. प्रीटोमॅनिडला यापूर्वीच भारतात सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनतर्फे मान्यता मिळाली आहे.

यावेळी हे नवे उपचार सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरीनंतर देशातील 75,000 टीबी रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे रुग्णांना बरे होण्यासाठी कमी वेळ लागणार असल्याचा दावा करण्यात येतोय.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने आरोग्य संशोधन विभागाशी सल्लामसलत करून टीबीवर करण्यात येणाऱ्या या नवीन उपचारांना मान्यता दिलीये. हे MDR-TB उपचार सुरक्षित आणि परवडणारे असण्याची खात्री करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने आरोग्य संशोधन विभागामार्फत आरोग्य मूल्यांकन देखील केलं असल्याची माहिती आहे.

Anti-TB drug
Monkeypox: मंकी पॉक्सचा धोका कोणाला, कसे आहेत यावर उपचार? पाहा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com