Himanshi Khurana Instagram @iamhimanshikhurana
मनोरंजन बातम्या

Himanshi Khurana: बिग बॉस १३ची स्पर्धक हिमांशी खुराना रुग्णालयात दाखल, -7 अंश तापमानात शूटिंग करणे पडले महागात

चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने हिमांशी रोमानियाला गेली होती.

Pooja Dange

Himanshi Khurana Update: 'बिग बॉस 13' मधून प्रसिद्धीझोतात आलेली पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानाची बातमी समोर आली आहे. तिला खूप ताप आल्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्री सध्या रोमानियामध्ये असून आणि तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होती.

अभिनेत्री हिमशी खुराना बिग बॉस १३ची स्पर्धक होती. शेहनाज गिलसोबत झालेल्या अनेक वादांमुळे ती चर्चेत असायची. हिमांशीला नुकताच एक बिग बजेट चित्रपट मिळाला होता. पंजाबी रोमँटिक चित्रपट तिला ऑफर झाला होता. (Bigg Boss)

या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने हिमांशी रोमानियाला गेली होती. यावेळी तापमान मायनसमध्ये आहे. हिमांशी अत्यंत थंड वातावरणात पावसाच्या सीक्‍वेन्सचे शूटिंग करत होती. ख्रिसमसच्या आधी काम पूर्ण करायचे असल्यामुळे ती विश्रांती न घेता लागोपाठ काम करत होती. तापमान -7 अंशच्या आसपास असताना दुसऱ्या दिवशीही तिने शूटिंग केले. त्याच दिवशी तिला खूप ताप आला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. (Movie)

प्रकृती गंभीर झाल्यानंतरही तिने शूटिंग सुरूच ठेवले. तिची प्रकृती जास्त खालावली. तिला अंथरुणातून उठताही येत नव्हते. त्यानंतर टीमने डॉक्टरांना बोलावले. आता ती पूर्णपणे बरी असून कामावर परतली आहे.

हिमांशीने काही दिवसांपूर्वी तिच्या मानसिक आरोग्याविषयी सांगितले होते. तिने सांगितले होते की, जेव्हा ती बिग बॉसच्या घरात गेली होती तेव्हा तिला कधीच वाटले नव्हते की तिचे आयुष्य बदलणार आहे. घरातील नकारात्मकतेमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. यातून बाहेर यायला त्याला सुमारे २ वर्षे लागली. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तिला पॅनिक अटॅक येत होते. अफसाना खानच्या लग्नात डान्स करताना हृदयविकाराचा त्रास झाला, त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात जावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Vastu Tips: किचनमधून आजच बाहेर काढा 'या' गोष्टी, पैशांची कमतरता होईल दूर

Maharashtra Live News Update: रांजणगावजवळ लोखंडी रोडने एसटी वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

Vande Bharat : महाराष्ट्रात किती वंदे भारत धावतात? जाणून घ्या संपूर्ण यादी अन् थांबे

Sara Ali Khan Boyfriend: सारा अली खान 'या' भाजप नेत्याच्या मुलालासोबत आहे रिलेशनशिपमध्ये?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार: विशेष मकोका न्यायालय

SCROLL FOR NEXT