Actress Kanika Mann Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Harassment: सुट्टीत आजोळी गेल्यावर चुलत भावाने केलं शारीरिक शोषण; अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Actress Kanika Mann :अभिनेत्री कनिका मानने बालपणी आजोळी घडलेल्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला. तिच्या या वक्तव्यामुळे समाजात अशा घटनांबाबत जागरूकतेची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Kanika Mann : हिंदी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान सध्या एका धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या बालपणी घडलेल्या अत्यंत वेदनादायक अनुभवाबद्दल उघडपणे सांगितले.

हॉटरफ्लाईला दिलेल्या एका मुलाखतीत कनिका मानने सांगितले की, ती लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी जात असे. त्या काळात तिच्यासोबत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. तिच्या नात्यातील एका मोठ्या भावाने तिचा गैरफायदा घेतला होता. हा अनुभव तिच्यासाठी खूपच वेदनादायक होता.

या घटनेबद्दल बोलताना कनिका मानने सांगितले की, त्या वयात मला काय घडत आहे हे पूर्णपणे समजत नव्हते. मात्र जसजशी ती मोठी होत गेली, तसतसे त्या घटनेचे गांभीर्य तिच्या लक्षात आले. या प्रसंगाने तिच्यावर खोल मानसिक परिणाम झाला होता.

चुलत भावाने कनिका मानसोबत केले असभ्य वर्तन

या घटनेमुळे ती इतकी घाबरले की, आपण प्रेग्नेंट होऊ की काय, या भीतीने ती पूर्णपणे घाबरली होती. त्या वयात, कनिकाला प्रेग्नेंसीबद्दलची कोणतीहीच समज नव्हती. तिने सांगितले, "त्या वेळी मी इयत्ता चौथीमध्ये शिकत होते. बाळाचा जन्म नक्की कसा होतो, हे मला माहीत नव्हते. पपई खाल्ल्याने गर्भपात होतो, अशा प्रकारच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या."

गर्भधारणेच्या भीतीने कनिकाने पपई खाल्ली

कनिका म्हणाली, "भीतीपोटी, मी खूप पपई खात असे. घरी असताना, माझी वहिनी किंवा मावशी अनेकदा त्या संदर्भात काहीतरी बोलत असत. मला भीती वाटायची की, जर मी प्रेग्नेंट झाले, तर पपई खाल्ल्याने ती प्रेग्नेंसी टळेल." कनिका मानचा हा खुलासा अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. विशेष म्हणजे, तिने इतक्या वर्षांनंतर हा अनुभव सर्वांसमोर मांडण्याचे धैर्य दाखवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरे मेट्रो स्टेशनजवळ बसला भीषण आग

Morning Back Pain: झोपून उठल्यावर पाठदुखी होते? मग बदला झोपण्याची पद्धत; 'या' चुका टाळा

मशिदींवरील अजानच्या ध्वनिप्रदूषणाला बापटांचा पाठिंबा? पाहा EXCLUSIVE मुलाखत|VIDEO

Bank Job: सरकारी बँकेत मिळवा नोकरी! 1100 पदांसाठी भरती, महिन्याला कमवा 93,000 रुपये

Healthcare Tips : पिरियड्समध्ये थकवा आणि पोटदुखी वाढतेय? या 7 चुका तर करत नाही ना?

SCROLL FOR NEXT