Dipika Kakar And Shoaib Ibrahim Reveals Son Name And Face Instagram
मनोरंजन बातम्या

Dipika And Shoaib Reveals Son Face: दीपिका शोएबने शेअर केली बाळाची पहिली झलक, नाव सांगत करुन दिली ओळख

Dipika And Shoaib Reveals Son Face: ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेकत्री दीपिका कक्करने नुकतंच चाहत्यांसोबत बाळाचा फोटो शेअर करत, बाळाचं नाव देखील सांगितलं आहे.

Chetan Bodke

Dipika Kakar And Shoaib Ibrahim Reveals Son Name And Face

‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेकत्री दीपिका कक्करने जून महिन्यामध्ये चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. तिने चाहत्यांसोबत पुत्ररत्न झाल्याची बातमी देखील शेअर केली होती. अखेर दीपिकाने आपल्या चाहत्यांना तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत बाळाच्या पहिला फोटो शेअर केला आहे. सोबतच तिने बाळाचं नाव देखील सांगितलं आहे.

शोएब इब्राहिमने फोटो शेअर केला असून त्याने फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, “तुम्हा सर्वांना मुलगा रुहानची ओळख करून देत आहे. कायमच आमच्यावर आशीर्वाद राहुद्या.” गौहर खानपासून ते लता सभरवालपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी दीपिकासह शोएबवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

अभिनेत्रीने प्री- मॅच्युअर बाळाला जन्म दिला असून बाळाला उपचारासाठी NICU मध्ये दाखल केलं होतं. त्याच्यावर काही दिवस रुग्णालयात उपचार ही सुरु होते. दीपिका आणि शोएब बाळाची व्यवस्थित काळजी घेत असून सध्या बाळाची तब्येत व्यवस्थित आहे. दीपिका आणि शोएब यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांनी लग्नाच्या ५ वर्षांनंतर पालक होण्याचा निर्णय घेतला होता.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची घोषणा केली होती. तिने आपल्या सिनेकारकिर्दित अनेक टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. ‘ससुराल सिमर का’, ‘बिग बॉस १२’, ‘नच बलिए ८’मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दरम्यान, दीपिकाने २०११ मध्ये, रौनक सॅमसनसोबत लग्नगाठ बांधली होती. पण त्यांचा काही कारणास्तव २०१५ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने २०१८मध्ये शोएब इब्राहिमसोबत लग्नबंधनात अडकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT